esakal | अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा असाइनमेंट बेस घ्या; मुख्यमंत्र्यांकडे कुणी केली मागणी?
sakal

बोलून बातमी शोधा

Students

सर्वोच्च न्यायालयाने आणि युजीसीने मान्यता दिलेल्या पद्धतीने मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, दिल्ली, छत्तीसगढ, पंजाब, पश्चिम बंगाल या राज्यांनी "होम असाईनमेंट किंवा ओपन बुक" पद्धत स्वीकारली आहे.

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा असाइनमेंट बेस घ्या; मुख्यमंत्र्यांकडे कुणी केली मागणी?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : अंतिम वर्षाची परीक्षा एमसीक्यू पद्धतीने घेऊन विद्यार्थ्यांवर अन्याय करू नका, परिस्थितीचा विचार करून अन्य राज्यांप्रमाणे असाइनमेंट बेस किंवा ओपन बुक परीक्षा घेतल्या जाव्यात, अशी मागणी स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 

अॅम्बुलन्स न मिळाल्याने पुण्यात मनसेचे 'खळ्ळ-खट्याक'!​

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे ठरवले आहे. सध्या विद्यार्थी हे अभ्यासापासून दुरावलेले असताना सोप्या पद्धतीने परीक्षा घेणे गरजेचे आहे. मात्र, उलट प्रॉक्टर्ड प्रणालीचा वापर करून एमसीक्यू पद्धतीने अवघड परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांना अनुभव नसताना अशी परीक्षा घेणे चुकीचे ठरेल. एका महिन्यात तयारी कशी काय करणार? यामुळे विद्यार्थी नापासच होतील. आधीच ६ महिने वाया गेले आहेत, निकाल १० दिवस उशिरा लावा, पण गडबडीत एमसीक्यू पद्धतीने ऑनलाईन परीक्षा घेऊ नका, अशी मागणी स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या सौरभ शेट्टी यांनी केली आहे. 

कोरोनामुळे भारतीयांचं मानसिक आरोग्याकडे झालंय दुर्लक्ष; तज्ज्ञ म्हणताहेत...

सर्वोच्च न्यायालयाने आणि युजीसीने मान्यता दिलेल्या पद्धतीने मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, दिल्ली, छत्तीसगढ, पंजाब, पश्चिम बंगाल या राज्यांनी "होम असाईनमेंट किंवा ओपन बुक" पद्धत स्वीकारली आहे. अशीच परीक्षा महाराष्ट्रात झाली पाहिजे. विद्यार्थी नापास होणार नाही आणि कोरोनाची भीतीसुद्धा असणार नाही. 
या पद्धतीने परीक्षा झाली पाहिजे, असे मुख्यमंत्री ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image
go to top