मंत्री दत्तात्रय भरणे यांना भाजी मंडईत अचानक पहाताच अनेकांची भंबेरी उडाली; पण....

डॉ. संदेश शहा
Friday, 17 July 2020

राज्याचे सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर शहरात इंगुले मैदानात भरणाऱ्या भाजी मंडईस भेट देऊन भाजी विक्रेते व ग्राहकांना कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासन सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले. इंदापूर बस स्थानक परिसरातील फळ विक्रते, मास्क वापरत नाहीत असे समजताच त्यांनी तात्काळ आपल्या गाडीतून शेकडो मास्क पाठवून देऊन सर्वाना मास्क वापरून स्वतः, आपले कुटुंब, तसेच नागरिकांचे रक्षण करण्याच्या सूचना दिल्या. मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या या कळकळीच्या आवाहनामुळे सर्वजण भारावून गेले.

इंदापूर - राज्याचे सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर शहरात इंगुले मैदानात भरणाऱ्या भाजी मंडईस भेट देऊन भाजी विक्रेते व ग्राहकांना कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासन सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले. इंदापूर बस स्थानक परिसरातील फळ विक्रते, मास्क वापरत नाहीत असे समजताच त्यांनी तात्काळ आपल्या गाडीतून शेकडो मास्क पाठवून देऊन सर्वाना मास्क वापरून स्वतः, आपले कुटुंब, तसेच नागरिकांचे रक्षण करण्याच्या सूचना दिल्या. मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या या कळकळीच्या आवाहनामुळे सर्वजण भारावून गेले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मंत्री भरणे हे इंदापूर येथे कोरोना आढावा बैठकीसाठी येत होते. त्यावेळी त्यांना इंगुले मैदानावर गर्दी दिसल्याने ते गाडीतून खाली उतरले. अचानक भाजी मंडईत मंत्री भरणे यांना पहाताच अनेकांची भंबेरी उडाली. भरणे यांनी हात जोडून सर्वाना चेहऱ्यास मास्क वापरण्याची विनंती केली. सर्वांनी सामाजिक अंतर पाळावे अशी विनंती केली.

विद्यार्थ्यांनो, यंदा अॅडमिशनसाठी 'कट ऑफ' वाढणार; 'या' शाखेत प्रवेशासाठी चढाओढ!

सर्व जण सॅनिटायझर किंवा साबणाने हात धुतात का याची चौकशी केली. लॉकडाऊन वाढवायचा का? असा प्रश्न त्यांनी भाजी विक्रेत्यांना करून त्यांची मने व मत जाणून घेतली. त्यामुळेलोकशाहीतआपल्याला देखील सन्मान आहे अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली. भरणे यांच्या या कृतीचे इंदापूरकरांनी स्वागत केले.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Many were shocked to see Minister Dattatraya Bharane in the vegetable market