Devendra Fadnavis Stresses Holistic Maratha Empowerment
esakal
पुणे : ‘‘मराठा समाजातील आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केवळ आरक्षण पुरेसे नाही. शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. याच उद्देशाने राज्य सरकारने सारथी (SARTHI scheme for Maratha students), अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ व विविध शैक्षणिक योजनांच्या माध्यमातून व्यापक काम उभे केले. त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत. त्यामुळे मराठा तरुणांच्या सक्षमीकरणासाठी सरकार कटिबद्ध आहे,’’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.