
राज ठाकरेंआधीच हिंदुत्ववादी नेते संभाजी महाराजांच्या समाधीवर, घडामोडींना वेग
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्या औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. त्याआधी ठाकरे पुण्यातून कार्यकर्त्यांच्या ताफ्यात रवाना झाले. ठाकरेंवर पुष्पफुलांचा वर्षावर करत पुरोहितांनी मंत्रांचं पठण केलं. यानंतर राज ठाकरे औरंगाबादला जाण्याआधी ते वढू या ठिकाणी संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेणार आहेत. मात्र ठाकरे वढूला पोहोचण्याआधीच त्या ठिकाणी भाजपचे काही नेते आणि त्यासोबतच हिंदुत्ववादी नेते मिलिंद एकबोटे दाखल झाले आहेत.
भाजपाचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेंगडे देखील या ठिकाणी पोहोचले आहेत. थोड्याच वेळात राज ठाकरे वढूला दाखल होणार असून भाजप आणि अन्य काही हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्तेही पोहोचले आहेत.
राज ठाकरे यांच्या भोंग्यांच्या भूमिकेला याआधीही भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. औरंगाबादमधील त्यांच्या सभेला हे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती पुढे येत आहे. ठाकरे यांच्या सध्याच्या भूमिकेवर भाजपचे नेते पाठिंबा देत आहेत. हनुमान चालिसा पठणातून भाजपने देखील महाविकास आघाडीला घेरण्याची तयारी सुरू केली आहे.
हेही वाचा: 100 पुरोहित, मंत्रांचं पठण आणि ठाकरेंच्या हिंदुत्वाचा थाट
Web Title: Maratha Leader Milind Ekbote Reaches At Sambhaji Maharaj Memorial Raj Thackeray News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..