मराठा मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 मे 2020

संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष, मराठा मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर (वय 56) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आज पहाटे निधन झाले.

पुणे : संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष, मराठा मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर (वय 56) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आज पहाटे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे. महाराष्ट्रात मराठा समाजाच्या मागण्यांसाठी झालेल्या प्रत्येक आंदोलनात, चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

त्यांच्यावर नुकतीच मानेची शस्त्रक्रिया झाली होती. त्यातून ते बरे होत असतानाच त्यांना काल हृदयविकाराचा झटका आला. खासगी रुग्णालयात त्यांचे निधन झाले. मुंढवा येथील केशवनगर स्मशानभूमीत त्यांच्यावर आज सकाळी अकराच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

अखिल भारतीय मराठा महासंघापासून त्यांनी आपल्या कामाची सुरवात केली. पुणे जिल्हा सरचिटणीस म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यानंतर मराठा सेवा संघ, बामसेफ अशा संस्थांशी त्यांचा संबंध आला. नंतर संभाजी ब्रिगेडची जबाबदारी त्यांनी सांभाळली. मराठा आरक्षणासाठी शिवनेरीवर झालेल्या आंदोलनात त्यांचा सहभाग होता. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हेलिकाॅप्टरवर दगडफेक केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. मराठा क्रांती मोर्चांच्या संयोजनात ते सक्रिय होते. राज्यात झालेल्या शेतकरी संपात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

'गेली 26 वर्षे ते सामाजिक कामात सहभागी होते. विचाराला कृतीशील जोड देणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती. परस्परविरोधी विचारांच्या लोकांशी समन्वय आणि संवादाचा पूल बांधून त्यांनी अनेक उपक्रम तडीस नेले.

अनेक अधिवेशन, मेळावे, मोर्चे त्यांच्यामध्ये त्यांचा सहभाग होता. छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्त्वाखाली निघालेल्या शिव-शाहू स्वराज्य यात्रेच्या आयोजनात त्यांची प्रमुख भूमिका होती. समाजाच्या हितासाठी दक्ष असणारा कार्यकर्ता म्हणून ते लक्षात राहतील, अशा शब्दांत मराठा महासंघाचे सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Morcha Coordinator Shantaram Kunjir passes away