esakal | मराठा आरक्षण रद्द! पुण्यात आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

बोलून बातमी शोधा

मराठा आरक्षण रद्द! पुण्यात आंदोलकांना घेतलं ताब्यात

मराठा आरक्षण हे नियमबाह्य असल्याचं सांगत राज्य सरकारने केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. यावर आता राज्यभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

मराठा आरक्षण रद्द! पुण्यात आंदोलकांना घेतलं ताब्यात

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे - मराठा आरक्षण हे नियमबाह्य असल्याचं सांगत राज्य सरकारने केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. यावर आता राज्यभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समजासाठी हे दुर्दैवी असल्याचं म्हटलं. तसंच कोरोनाच्या संकटकाळात आता मराठा समाजाने शांतता बाळगावी असं आवाहनही त्यांनी केलं. दरम्यान, पुण्यात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मराठा कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरु केलं आहे. यातील काही लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मराठा तरुणांमध्ये नाराजी आहे. सर्वोच्च न्यायालय आरक्षणाच्या बाजूने निकाल देईल अशी अपेक्षा विद्यार्थ्यांची होती. सध्या जमावबंदी लागू असल्यानं आंदोलन करता येणार नाही. जर आंदोलन केलं तर पोलिस याविरोधात कारवाई करतील.

पुण्यात मराठा क्रांती मोर्चाकडून काळ्या फिती लावून सरकारविरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे, धनंजय जाधव, तुषार काकडे, रघुनाथ चित्रे, बाळासाहेब आमराळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. दुसरीकडे पंढरपुरातही रस्त्यावर अर्धनग्नावस्थेत मराठा समाजाने आंदोलन सुरु केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा: मराठा आरक्षण रद्द करताना सुप्रीम कोर्ट काय म्हणाले

हे राज्य सरकारचं अपयश - भाजप

भाजप प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी मराठा आरक्षण रद्द झाल्याचे खापर राज्य सरकार यांच्यावर फोडले आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले, ''मराठा आरक्षणाबाबात सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाला आहे. मराठा समाजाला 50 टक्के आरक्षण देता येणार नाही हे कारण सांगून आरक्षण फेटाळले आहे. संपुर्णपणे महाराष्ट्र सरकारचे अपयश आहे. गायकवाड समितीचा अहवाल अस्विकारर्ह्य आहे.

पुण्याच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा