
maratha reservation kunbi records pune district junnar khed ambegaon hyderabad gazette caste certificate statistics 2025 ymk86
esakal
पुणे जिल्ह्यात 2.86 लाखांहून अधिक कुणबी नोंदी आढळल्या असून, 51 हजारांहून अधिक अर्जदारांना दाखले मिळाले.
आंबेगाव, जुन्नर आणि खेड तालुक्यांत सर्वाधिक कुणबी दाखले वितरित झाले आहेत.
मराठा-कुणबी प्रमाणपत्रांसाठी 13 प्रकारची कागदपत्रे आणि निजामकालीन पुरावे तपासून प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया राबवली गेली.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण आंदोलन केल्यानंतर सरकारने मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याबाबत हैद्राबाद गॅझेटियरचा जीआर काढला आहे. मात्र राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा जीआर काढण्यापूर्वीच मागील दोन वर्षातील पुणे जिल्ह्यातील कुणबी नोंदींची आकडेवारी समोर आली आहे.