esakal | ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षण नको, अन्यथा...; हाकेंचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

maratha reservation

ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षण नको, अन्यथा...; हाकेंचा इशारा

sakal_logo
By
सागर आव्हाड

मुंबई : मराठा समाजाला (Maratha community) ओबीसी कोट्यातून (OBC quota) आरक्षण देण्यात येऊ नये, अन्यथा प्रतिमोर्चे (counter rally) काढण्यात येतील असा इशारा ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके (Prof. Lakshman Hake) यांनी दिला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. (Maratha reservation not from OBC quota otherwise called aggitaion Lakshman Hake)

हेही वाचा: Breaking: एमपीएससीने PSI भरतीसंदर्भात घेतला महत्वपूर्ण निर्णय

प्रा. हाके म्हणाले, "महाराष्ट्रातल्या ५२ टक्के ओबीसी आणि भटक्या जाती-जमातींना कोणीही गृहीत धरून बेताल वक्तव्ये करू नयेत अन्यथा आपल्या अधिकारांसाठी राज्यातील सर्व भटक्या जाती-जमतींसह ओबीसी बांधव रस्त्यावर उतरतील" यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात निवेदन सादर करण्यात येणार असल्याचंही हाके यांनी सांगितलं. यामुळे पुन्हा एकदा मराठा आणि ओबीसी नेत्यांमध्ये वाद उद्भवण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: लशीकरण मोहीम खंडीत होऊ नये यासाठी डॉ. कांग यांनी सांगितला उपाय

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आता ओबीसींमध्ये मराठ्यांना सामावून घेण्यासाठी धडपड सुरु झाली आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत हे करू नका. ओबीसी समाजाची तात्काळ जनगणना करा. नोकरभरती सुरू करा अन्यथा ओबीसी समाजही रस्त्यावर उतरेल. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ओबीसी आणि भटक्या जाती-जमातीच्यावतीने प्रतिमोर्चे काढू असा इशाराही प्रा. हाके यांनी दिला आहे.