
शिरूर : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या आंदोलनाला यश आल्याचा जल्लोष शिरूरकरांनी गुलाल उधळून केला. शिवरायांसह जरांगे यांच्या प्रतिमेची वाद्यांच्या गजरात शहरातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी 'एक मराठा लाख मराठा' च्या गर्जनांनी कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.