Maratha Reservation : आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक, विरोधकांनी सहकार्य करावे - एकनाथ शिंदे

राज्यसरकार मराठा आरक्षणाच्या मागे ठामपणे उभे आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिले होते, पण दुर्दैवाने सुप्रीम कोर्टाने रद्द केले
Maratha Reservation : आरक्षण देण्यासाठी  सरकार सकारात्मक, विरोधकांनी सहकार्य करावे - एकनाथ शिंदे

मंचर - मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. हा प्रश्न राजकीय नसून सामाजिक आहे. मराठा समाज आरक्षण प्रश्न मार्गी लावण्यासाठी विरोधकांनी सहकार्य करावे.” असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

लांडेवाडी (ता.आंबेगाव) येथे सोमवारी (ता.११) झालेल्या पत्रकार परिषदेत शिंदे बोलत होते. यावेळी समवेत खासदार श्रीकांत शिंदे होते. शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, कल्पना आढळराव पाटील, आमदार वल्लभ बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, सरपंच संगिता शेवाळे यांनी स्वागत केले.

शिंदे म्हणाले “राज्यसरकार मराठा आरक्षणाच्या मागे ठामपणे उभे आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिले होते, पण दुर्दैवाने सुप्रीम कोर्टाने रद्द केले. आता कायदा टिकला पाहिजे. मराठा समाज शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागास आहे. हे निदर्शनास आणून देणे आवश्यक आहे. जे आरक्षण देऊ ते टिकेल अशी सरकारची भूमिका आहे.

Maratha Reservation : आरक्षण देण्यासाठी  सरकार सकारात्मक, विरोधकांनी सहकार्य करावे - एकनाथ शिंदे
Pune : पंचलिंग शिवालयात स्वयंभू पाच शिवलिंग,तांदळाच्या पिंडीच्या दर्शनास मोठी गर्दी

इतर ओबीसी समाज आहे त्यांचे आरक्षण कमी न करता जसे यापूर्वी आरक्षण दिले होते तसे आरक्षण मराठा समाजाला पुन्हा देऊ. सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली, त्यावेळी मुलाखती व निवड झालेल्या तीन हजार ७०० मराठा उमेदवारांना नोकऱ्या दिल्या. सारथी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व परदेशी शिक्षण या योजनांचा लाभ दिला जात आहे.

आरक्षणासाठी सोमवारी (ता.११) सर्वांची मंत्रालयात बैठक बोलावली आहे. प्रत्येकाच्या सूचनांचा विचार करून मराठा समाजाला न्याय कसा मिळेल. हा विचार केला जाईल. शासन कोणालाही फसऊ इच्छित नाही. जो निर्णय होईल त्याप्रमाणे कायदा टिकला पाहिजे. कायदाच्या चौकटीत राहून काम करू. सर्वोच्च न्यायालयात दावा प्रलंबित आहे. सुप्रीम कोर्टाला आपण विनंती करण्याचा प्रयत्न करणार आहोत.”

Maratha Reservation : आरक्षण देण्यासाठी  सरकार सकारात्मक, विरोधकांनी सहकार्य करावे - एकनाथ शिंदे
Nagpur Crime : दारूच्या नशेत आधारकाठीने केला जन्मदात्या पित्याचा खून

सारटी-जालना येथे जरंगे पाटील यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला काय अपेक्षीत आहे? या प्रश्नाला उत्तर देताना शिंदे म्हणाले “सत्ताधार्या प्रमाणेच विरोधी पक्षाचीही कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे. यामध्ये राजकारण करण्याची कोणाची भूमिका असता कामा नये. अनेक ठिकाणी आंदोलन होत आहेत. कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून सर्वांनी शांतता सुव्यवथा टिकून ठेवावी.”

Maratha Reservation : आरक्षण देण्यासाठी  सरकार सकारात्मक, विरोधकांनी सहकार्य करावे - एकनाथ शिंदे
Kolhapur News : इचलकरंजीत पत्नीवर कोयत्याने हल्ला,चारित्र्याच्या संशयावरून भररस्त्यात कृत्य

दरम्यान मराठा आरक्षणाबाबत अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष अंकुश लांडे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने दत्ता थोरात, सुहास बाणखेले, लक्ष्मण थोरात भक्ते, शिवसेनेच्या वतीने उपजिल्हा प्रमुख रविंद्र करंजखेले, सुनिल बाणखेले, संतोष डोके, भैरवनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे, योगेश बाणखेले, रमेश खरमाळे यांनी स्वागत केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com