
पुणे : "आम्हाला छोटे-छोटे पक्ष म्हणून हिणवण्यात आले. आज ज्या पक्षाचे अडीचशे आमदार, तीनशे खासदार आहेत, त्या पक्षाला आरक्षणाच्या प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी शरद पवार यांच्याकडे वळावे लागते. मुंबईतील मराठा आंदोलनाला आत्ताचे सरकारच जबाबदार आहे, अजूनही आंदोलन हाताबाहेर गेलेले नाही. सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवावी आणि सर्वाशी चर्चा करावी. त्यासाठी कॅबिनेट बोलवा, अधिवेशन बोलवा चोवीस तासात सगळे मान्य करून टाकावे' अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला आरक्षणासंबंधीच्या प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी आवाहन केले.