CM Devendra Fadnavis
sakal
पुणे - मुंबईत मनोज जरांगे पाटील यांच्या संभाव्य आंदोलनाची तयारी सुरू असतानाच मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारने पुण्यात बैठकांचा धडाका लावला. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीच्या निमित्ताने पुण्यात आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपसमितीच्या सदस्यांसोबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. आंदोलनाचा तिढा वाढण्यापूर्वीच तोडगा काढण्यासाठी सरकारच्या पातळीवर हालचालींना वेग आला आहे.