#MarathaKrantiMorcha पहिल्या मराठा क्रांती चौकाचे तळेगावात अनावरण

गणेश बोरुडे
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

तळेगाव स्टेशन - मराठा क्रांती मोर्चाचे प्रतीक म्हणून तळेगाव-चाकण रस्त्यावरील सिंडिकेट बॅंकेसमोरील देशातील पहिल्या मराठा क्रांती चौकाचे नामकरण आणि स्मारकाचे शानदार अनावरण स्वातंत्र्यदिनी सकाळी करण्यात आले.

नऊ ऑगस्टला राज्यभर झालेल्या मराठा क्रांती मोर्चा आंदोलनाच्या अनुषंगाने जाहीर करण्यात आलेल्या "मराठा क्रांती चौक" स्मारक अनावरण आणि नामकरण शिवस्वराज्यातील सरदार दाभाडे घराण्याच्या चिमुकल्या वारसदार दीवीजाराजे धवलसिंहराजे दाभाडे आणि देवीश्रीराजे धवलसिंहराजे दाभाडे भगिनींच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी सकाळी अकरा वाजता करण्यात आले. 

मावळचे आमदार बाळा भेगडे, उद्योजक किशोर आवारे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्ष संग्राम काकडे, अंजलीराजे दाभाडे, सत्येंद्रराजे दाभाडे, याज्ञसेनीराजे दाभाडे, सत्यशीलराजे दाभाडे, दिव्यलेखाराजे दाभाडे, अॅड. रविंद्र दाभाडे, सुलोचना आवारे, चंद्रभान खळदे, गणेश भेगडे, गणेश खांडगे, सुनिल शेळके, संतोष दाभाडे पाटील, किरण ओसवाल सुनिल करंडे, संतोष शिंदे, अरुण भेगडे, प्रशांत ढोरे, संतोष लोणकर, महेश बेंजामीन, अमोल शेटे, सुनिल पवार, सचिन टकले यांच्यासह शेकडो सर्वजातधर्मीय समाजबांधव या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार ठरले.

यावेळी बोलताना आमदार संजय उर्फ बाळा भेगडे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रा जशी मांगल्याचे प्रतीक आहे त्याप्रमाणे सामाजिक ऐक्य आणि क्रांतीचे प्रतीक असलेला मराठा क्रांती चौक हा ऐतिहासिक ठरावा. कुठल्याही समाजघटकावर अन्याय होत असल्यास त्याविरोधात क्रांतीची सुरुवात याच चौकातून पेटेल. दरवर्षी ऑगस्ट क्रांती दिनाला इथे मानवंदना दिली जाईल याची ग्वाही आमदार भेगडे यांनी दिली.

प्रातिनिधिक स्वरूपात विविध समाजबांधवानी मराठा समाजाच्या आरक्षणासह मराठा क्रांती मोर्चाला आपला जाहीर पाठींबा यावेळी व्यक्त केला. नवलाख उंबरेचे सरपंच दत्तात्रेय पडवळ यांनी सुत्रसंचलन केले. सुशिल सैंदाने यांनी आभार मानले. समीर दाभाडे, शेखर दाभाडे, बळीराम वाघमारे, भिमसेन मिरजे यांच्यासह आदर्श रिक्षा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नियोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

देशातील पहीला मराठा क्रांती चौक
महाराष्ट्रासह कर्नाटकात आजपावेतो अभूतपूर्व मराठा क्रांती मोर्चा आंदोलने झाली.या सामाजिक क्रांतीचे प्रतीक म्हणून उद्योजक किशोर आवारे यांच्या विशेष पुढाकारातून नामकरण करण्यात आलेला तळेगाव दाभाडे येथील मराठा क्रांती चौक हा या प्रकारचा देशातील पहीला मराठा क्रांती चौक ठरल्याचे मावळ सकल मराठा समाजातर्फे जाहीर करण्यात आले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MarathaKrantiMorcha inauguration of First Maratha Kranti Chowk in Talegaon