महामार्गांच्या सुरक्षिततेसाठी मराठी कलावंतांचे प्रबोधन !
पुणे : महामार्गावर लेन क्रॉस करू नका... वेगमर्यादेचे उल्लंघन करू नका.... वळणावर वाहनांचा वेग कमी करा.... असे सल्ले एरवी पोलिस देतात. पण, आता हे सल्ले आपल्याला कलावंत देणार आहेत अन तेही महामार्ग पोलिसांच्या मदतीने.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
अपघातांबद्दल वाहनचालकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी अक्षयमार्ग फाउंडेशनने हा अभिनव उपक्रम हाती घेतला असून त्याला सुरूवातही झाली आहे. पुण्यातून जाणाऱ्या सोलापूर, नाशिक, मुंबई द्रुतगती मार्ग आणि कोल्हापूर मार्गावर अक्षय फाउंडेशन या उपक्रमाची अंमलबजावणी करणार आहे. त्यात सचिन खेडेकर, सिद्धार्थ जाधव, चिन्मय मांडलेकर, वैभव मांगले, दिग्पाल लांजेकर, हरीश दुधाडे, उमेश कामत, प्रिया बापट, पुष्कर श्रोत्री आदी कलावंत, दिग्दर्शक सहभागी होणार आहेत. हे कलावंत स्वतंत्र थीमवर काम करणार असून त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर तसेच टोल नाके, महामार्गांवरील हॉटेल, ढाबे, पेट्रोल पंपांवरील डिजिटल स्क्रीनवर प्रक्षेपित करणार आहेत. अक्षयमार्ग फाउंडेशनच्या मदतीने या उपक्रमाचे नियोजन सुरू असल्याची माहिती महामार्ग पोलिस विभागातील अधीक्षक विजय पाटील यांनी दिली.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पायाभूत सुविधांवर भर
पायाभूत सुविधा निर्माण करणार चारही प्रमुख महामार्गांवर ट्रॉमा केअर युनिट उभारणे, चारही मार्गांवर पुरेशी स्वच्छतागृहे, फिडिंग रूम उभारणे, बायफेन रोप लावणे, ब्लाईंड स्पॉट दूर करणे, विशिष्ट ठिकाणी कॅमेऱ्यांचे जाळे उभारणे आणि ते कंट्रोल रूमला जोडणे, रस्त्यावर पुरेशी चिन्हे अन फलक लावणे, पोलिसांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे आदी गोष्टींवर भर देणार असल्याचे अक्षय फाउंडेशनचे विश्वस्त तन्मय पेंडसे यांनी सांगितले. वाहतुकीशी संबंधित घटकांनाही या उपक्रमांत सहभागी करून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
असा असेल ऍक्शन प्लॅन
1) वाहतुकीच्या नियमांबद्दल वाहनचालकांमध्ये जागरूकता निर्माण करणे.
2) पायाभूत सुविधांसाठी रस्त्यांवर सर्वेक्षण करणे.
3) रोड इंजिनिअरिंगमधील मूलभूत तत्त्वांचे पालन करण्यासाठी शासकीय यंत्रणांकडे पाठपुरावा करणे.
4) लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने रस्ते सुरक्षित करणे.
5) पोलिसांसाठी वैद्यकीय शिबिरे आयोजित करणे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
महामार्गांवर वाढत्या अपघातांची संख्या कमी करण्यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत. आता मराठी कलावंतांचीही मदत घेण्यात येणार आहेत. चित्रपट, दूरचित्रवाणी मालिकांच्या माध्यमातून त्यांचे चेहरे लोकांना ओळखीचे वाटतात. त्यामुळे कलाकारांनी प्रबोधनासाठी आवाहन केल्यावर, त्याला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे.
- विजय पाटील, अधीक्षक, महामार्ग पोलिस
रस्त्याचे नाव 2018 अपघात मृत्यू 2019अपघात मृत्यू
पुणे - नाशिक 416 220 459 230
पुणे- मुंबई एक्स्प्रेस वे 358 110 306 92
पुणे- सोलापू 660 294 567 285
पुणे- कोल्हापूर - 186 103 168 82
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.