
पुणे : केवळ पोटाची भूक ठरवणे गरजेचे नसून कोरोनासारख्या या परिस्थितीत मानसिक मनोबल देखील वाढवले पाहिजे. त्यातूनच आपले देशबांधव तग धरू शकतात या भावनेतून लॉकडाऊनच्या काळात जर्मनीत अडकलेल्या भारतीय नागरिकांची होत असलेली परवड 'मराठी कट्टा जर्मनी' संस्थेने कमी केली. महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील विविध राज्यातून आलेल्या 23 नागरिकांना संस्थने मदत केली. अगदी परदेशात देखील आपल्या देशबांधवांनाकडून मिळालेल्या या प्रेमामुळे गरजू अगदी भारावून गेले.
या उपक्रमाबाबत माहिती देताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अजित रानडे यांनी सांगितले, "मराठी कट्टा जर्मनीतर्फे सामाजिक कर्तव्य म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला. काही दिवसांच्या कालावधीसाठी आलेले भारतीय नागरिक लॉकडाऊनमुळे जर्मनीमध्ये अडकले. या कठीण काळात त्यांच्यावर आर्थिक अडचणी उद्भवत असल्याने संस्थेच्या सदस्यांनी आपापल्या परीने मदतीचा हात दिला. संस्थेच्या सदस्यांनी काही लोकांच्या राहण्याची तर काहींनी जेवणाची सोय केली. तसेच या चिंतेच्या वातावरणात यांचे मनोबल वाढविण्यासाठी समुपदेशन कार्य देखील करण्यात आले. अडकलेल्या या 23 नागरिकांमध्ये मध्ये चार मराठी विद्यार्थी देखील होते. तसेच या नागरिकांना भारतात पाठविण्यासाठी योग्य ती मदत पुरवली जात आहे."
या संस्थेशी जर्मनीतील सुमारे चार हजार लोकं जोडलेली आहेत. सर्व सदस्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता. तसेच यावेळी फ्रँकफूर्ट भारतीय दूतावासमधील कॉन्सुल जनरल (परराष्ट्रातील वकील) प्रतिभा पारकर, मोहिनी काळे, जीवन करपे, अक्षय जोशी, जानवी देशमुख सारख्या सदस्यांनी महत्वाची भूमिका बजावली. तसेच लॉकडाऊनमुळे रुग्णालयात जाणे शक्य नसल्याने डॉ. मेघा जाधव यांनी व्हिडिओ कॉलिंगच्या साहय्याने रुग्णांशी संबंध साधून सल्ला देण्याचे काम केले. असे रानडे यांनी सांगितले.
जर्मनीमध्ये सुमारे दोन लाख भारतीय नागरिक राहतात. 'मराठी कट्टा जर्मनी' तर्फे केवळ भारतीय उत्सव नाही तर इतर सामाजिक उपक्रम देखील राबविले जातात. भारतातून जर्मनीमध्ये नागरिक पर्यटनासाठी, नातेवाईकांना भेटण्यासाठी तर विद्यार्थी शिक्षण आणि इंटर्नशीपसाठी येतात."
-अजित रानडे, संस्थापक अध्यक्ष- मराठी कट्टा जर्मनी
मराठी शाळा आणि ग्रंथालयाची स्थापना : महाराष्ट्राची संस्कृती, इतिहास आणि भाषा आपल्या मुलांमध्ये भिनली जावी यासाठी संस्थेच्यावतीने मराठी पुस्तकांचे ग्रंथालय आणि मराठी शाळेची स्थापना करण्यात आली आहे. या ग्रंथालयात सुमारे एक हजार मराठी पुस्तके आहेत. तर प्रत्येक शनिवारी मराठी शाळा चालविण्यात येते. परदेशात राहून सुद्धा आपल्या भाषेला जोपासण्यासाठी तसेच मुले या भाषेपासून वंचित राहू नये, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. व्यवसायाच्या क्षेत्रात देखील मराठी नागरिकांची संख्या वाढावी यासाठी त्यांचे संस्थेमार्फत मार्गदर्शन केले जाते, अशी माहिती रानडे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.