ट्रक चालकाचा उपचारा दरम्यान मृत्यू

संदिप घिसे
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

पिंपरी : चिंचवड रेल्वे उड्डाण पुलाजवळ लोकमान्य हॉस्पिटल शेजारी दोन दिवसांपूर्वी ट्रक दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात जखमी ट्रक चालक रेवणनाथ कोपणर यांचा शुक्रवारी (ता. २२) उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातास वाहतूक पोलिस जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. जोपर्यंत वाहतूक पोलिसांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे नातेवाईकांनी पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Marathi news injured truck driver get dies