कनिष्ठ लिपिकास लाच घेताना अटक

संदिप घिसे
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

पिंपरी : ठेकेदाराचे बील देण्यासाठी चार हजारांची लाच घेणाऱ्या कनिष्ठ लिपिक प्रकाश जयसिंग रोहकले (वय ३९, पिंपळे गुरव) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. तो पिंपरी-चिंचवड महापालिकेतील लेखा विभागात कामावर आहे. फिर्यादी यांचा महापालिकेच्या शाळेतील बायोमेट्रीक मशिन दुरूस्तीचा ठेका आहे. एक लाख ६४ हजारांचे बील काढण्यासाठी आरोपी रोहकले याने चार हजारांच्या लाचेची मागणी केली होती याबाबत ठेकेदाराने तक्रार केल्यावर लाच घेताना शुक्रवारी दुपारी त्यास अटक केली.

Web Title: Marathi news junior clerk arrested for bribe in pimpri