हा छंद जिवाला लावी पिसे

शिवाजी आतकरी
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

निगडी - कुणाला कशाचा छंद असेल याचा नेम नाही. मुलखावेगळ्या छंदाचे आपण किस्से ऐकतो. या किस्स्यांचे कधी अप्रूप वाटते, तर कधी आपण अचंबित होतो. काही छंद असे की हसून आपण लोटपोट होतो, तर काही छंदांमुळे आपण सहज बोलून जातो, की त्याला वेड लागलेय. असाच एक छंदवेडा. जगातील सर्व महागड्या ब्रॅंडची वाहने आपल्याकडे असावीत असे त्या छंदवेड्याचे स्वप्न!

युरोपियन लेखिका रोंडा बर्न यांच्या ‘द सिक्रेट’ कादंबरीत पात्र शोभावा असा हा अवलिया. या कादंबरीत सांगितलंय की सकारात्मक विचार करा. जे पाहिजे ते मिळाल्याचे कल्पनाविश्‍व निर्माण करा. त्या कल्पनाविश्‍वात वावरा. हे केल्याने तुमची स्वप्ने आकारास येतात. यास शास्त्रीय आधार लेखिका देते. नेमके हेच या ध्येयवेड्या तरुणाने हेरले आहे. छंदातून ध्येयाकडे जणू हे बिरुद घेऊन संतोष घोणे हा व्यावसायिक वाटचाल करीत आहे.

आपल्याकडे जगातील उत्तम चारचाकी, दुचाकी असाव्यात असे संतोष घोणे यांचे स्वप्न. स्वप्न तसे अवघड. स्वप्न पूर्ण होण्यास करोडो रुपये लागणार. स्वप्न पूर्ण होईल; पण प्रयत्न तर केले पाहिजेत. या विचारातून छंदाने जन्म घेतला. मग जर्मनी, सिंगापूर, मलेशिया, दुबई, श्रीलंका, थायलंड येथून त्या देशात असलेल्या प्रसिद्ध वाहनांची खरेदी घोणे यांनी केली. मग, फेरारी, ऑडी, हमर, मर्सिडीज, फोक्‍सवॅगन, रेंजरोवर, लॅंडक्रूझर या आंतरराष्ट्रीय महागड्या ब्रॅंड त्यांनी घेतले. इतकंच काय थायलंडमधील रिक्षा, दुबईतील स्पोर्टबाइक त्यांनी खरेदी केल्या. परदेशांतील ट्रॅक्‍टर, हेलिकॉप्टर ते खासगी विमान त्यांच्या दिमतीला आले. छंदातून त्यांनी शेकडो वाहने जमवली. अगदी हुबेहूब वाटावीत, अशीही मॉडेल आहेत.

संतोष घोणे सांगतात, ‘‘हे स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा माझा छंद देत आहे. दरवर्षी नवीन गाडी मी घेतो. ते या मॉडेलकडे पाहूनच.’’ अगदी ‘शो-रूम’मध्ये शोभावीत अशी मॉडेल घोणे यांनी जमवली आहेत.

Web Title: marathi news pimpri news pune news santosh ghone hobby vehicle model