अन्यथा संबंधितांनी कंपनी बंद करण्याची तयार ठेवावी - आ. कुल  

प्रफुल्ल भंडारी
रविवार, 11 फेब्रुवारी 2018

दौंड - कुरकुंभ (ता. दौंड) एमआयडीसी व परिसरातील प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांनी स्वतःहून प्रदूषण करणे थांबवावे अन्यथा संबंधितांनी कंपनी बंद करण्याची तयार ठेवावी, असा स्पष्ट इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांनी दिला आहे. कुरकुंभ येथे पत्रकारांशी संवाद साधताना आमदार राहुल कुल यांनी एका प्रश्नाच्या उत्तरार्थ हा इशारा दिला. कुरकुंभचे प्रभारी सरपंच रशीद मुलाणी यांच्यासह सुनील पवार, दिलीप भागवत व संतोष सोनार यावेळी उपस्थित होते. 

आमदार राहुल कुल म्हणाले, कुरकुंभ एमआयडीसी मधील प्रदूषण थांबविण्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करीत असून संबंधित खात्याचे मंत्री, अधिकारी, जिल्हाधिकारी आणि विधीमंडळाच्या समिती सदस्यांचा पाहणी दौरा घडवून आणलेला आहे. त्यानंतर प्रदुषणाचे प्रमाण कमी झाले. परंतु काही कंपन्यांचा अपवाद वगळता छोट्या - मोठ्या कंपन्या प्रदूषण करीत प्रक्रिया न केलेले सांडपाणी व रासायनिक घटक शेतजमीन, वन खात्याची जागा व ओढ्यांमध्ये सोडून देत असल्याच्या तक्रारी आहेत. संबंधित कंपन्यांनी प्रदूषण बंद न केल्यास सदर कंपनी बंद करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही माझ्या पातळीवर करण्यात येईल. रासायनिक क्षेत्र असलेल्या या एमआयडीसीमध्ये रोजगाराचे प्रमाण कमी असले तरी स्थानिकांना गुणवत्तेनुसार नोकरी मिळत असून विविध कामांची कंत्राटे मिळत आहेत, असे माझे निरीक्षण आहे.                      

ते पुढे म्हणाले, नगर-दौंड-कुरकुंभ-गुंजखिळा हा राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत काँक्रिटचा केला जात आहे. या महामार्गाचा भाग असलेला दौंड शहरातील रेल्वे उड्डाण पूल ते गजानन सोसायटी मार्गे रोटरी सर्कल दरम्यानच्या रस्त्यावरील जेवढी अतिक्रमणे काढणे शक्य आहे तेवढी काढली जातील. उपलब्ध जागेचा विचार करता शहराच्या नागरी भागातून जाणाऱ्या या महामार्गालगत सेवा रस्त्याचा सध्या विचार नाही. 

माहिती द्या, कारवाई नक्की होणार...
सवंग प्रसिध्दीसाठी काही कंपन्या बोअरवेलमध्ये प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडून देत असल्याच्या तक्रारी माझ्याकडे करण्यात आल्या होत्या. परंतु प्रत्यक्ष पाहणी केली असता सदर बोअरवेल आढळून आले नाही. प्रदूषणासंबंधी पुराव्यासह ठोस तक्रारी माझ्याकडे आल्यास निश्चित कारवाई केली जाईल, असे आ. कुल यांनी सांगितले.

Web Title: marathi news pune mla rahul kul midc pollution