बाभळीच्या झाडांच्या साल काढल्यामुळे झाडे धोक्यात

राजकुमार थोरात 
रविवार, 7 जानेवारी 2018

वालचंदनगर - इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये बाभळीच्या झाडांच्या साली काढण्याच्या प्रकारामुळे साध्या बाभळीच्या झाडांना धोका निर्माण झाला आहे. ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर व रस्त्यालगत साध्या बाभळीची असंख्य झाडे आहेत. गेल्या काही दिवसापासून या झाडांच्या साली काढण्याचे काम सुरु असल्याने बाभळीच्या झाडांना धोका निर्माण झाला आहे. 

अज्ञात नागरिक रस्त्यालगतच्या झाडांच्या साली काढून गावठी दारुसाठी याचा उपयोग करु लागले आहेत. मात्र या प्रकारामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. यासंदर्भात पर्यावरण अभ्यासक डॉ. महेश गायकवाड यांनी सांगितले की, निर्सगामधील सर्वात महत्वाचे बाभळीचे झाड आहे. हे झाड अत्यंत कमी पाण्यावरती जगते. उन्हाळ्यामध्ये या झाडांच्या पाल्याचा उपयोग मेंढपाळ शेळ्या, मेंढ्यांच्या चाऱ्यासाठी करतात. तसेच चिंकारा जातीची हरणे ही छोट्या बाभळीच्या झाडांचा पाला खात असतात. बाभळीच्या शेंगाचा उपयोग दंतमंजन तयार करण्यासाठी ही केला जातो. घरगुती पद्धतीने दंतमंजन तयार करुन याचा वापर करता येतो. या झाडांच्या छोट्या फांदीने दात ही चांगले साफ करता येतात. बाभळीपासून डिंक मिळत असून निर्सगातील अन्नसाखळीत बाभळीच्या झाडाला फार महत्व आहे. पक्षी सर्वांत जास्त घरटी बाभळीच्या झाडावर बनवतात. बाभळीच्या झाडाची साल काढल्यास हे झाड काही दिवसामध्ये जळून (वटून) जात असल्याने समाजातील नागरिकांनी बाभळीच्या झाडांच्या साली काढण्याचे प्रकार रोखण्याची गरज असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

Web Title: marathi news pune news Acacia tree environment