न्युरॉलॉजिकल उपचारांसाठी कृत्रिम बुद्धीमतेच्या वापराचे संशोधन पूर्ण - डॉ. जस्टीन डॉवेल

MIT
MIT

लोणी काळभोर (पुणे) : ऐपिलेप्सि या न्युरॉलॉजिक समस्येसाठी सध्या वापरण्यात असलेल्या पद्धतीत खूप वेळ जातो, त्यामुळे रुग्ण दगावण्याची संख्या वाढते. तसेच रुग्णांवर न्युरॉलॉजिकल उपचारांसाठी कृत्रिम बुद्धीमतेच्या वापराचे संशोधन पूर्ण झाले असून, लवकर मुंबई आणि पुण्यातील अनेक हॉस्पीटलमध्ये याचा उपयोग केला जाणार असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधक डॉ. जस्टीन डॉवेल यांनी लोणी काळभोर (ता. हवेली) येथे केले.

लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलाजी विद्यापीठातील स्कूल ऑफ बायोइंजिनिअरिंग सायन्सेस अँड रिसर्च विभागातर्फे आयोजित 'बायोइंजिनियरिंग मधील सध्याचे ट्रेंड' या पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत (आयसीआरटीबी - २०१८) ते बोलत होते. यावेळी एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. मंगेश कराड, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनील राय, डॉ. मेधा घैसास, माईर्स मेडिकल कॉलेजचे कार्यकारी अध्यक्ष 
डॉ. वीरेंद्र घैसास, बायोइंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. रेणु व्यास, संचालक विनायक घैसास उपस्थित होते. या परिषदेत आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील दोनशेहून अधिक तज्ज्ञ प्रतिनिधींनी सहभाग घेतला.

यावेळी जस्टीन डॉवेल म्हणाले,"ऐपिलेप्सि समस्येचे निदान करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून उपचार व निदानाचा मार्ग अधिक सोपा झाला. तसेच इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राफीचा (ईईजी) उपयोग केल्याने कमी वेळेत अचूक 
निदान होणार आहे. जागतिक स्तरावर ही समस्या सोडविण्यासाठी आम्ही एक सॉफ्टवेअर तयार केले आहे. हे सॉफ्टवेअर लवकरच मुंबई आणि पुण्यातील अनेक हॉस्पीटलमध्ये लावण्यात येणार आहे." 

दरम्यान जस्टीन डॉवेल यांनी आर्टीफिशयल इंटिलीज्यंस ऑफ ऐपिलेप्सि युजिंग ईईजी स्कॅनविषयी अधिक माहिती दिली. तसेच सीएसआयआर एनसीएल पुणे, एनसीसीएस, एसपीपीयू, डीआयएटी, सीआयएफई मुंबई, बीआयटीएस, पॉंडिचेरी युनिव्हर्सिटी, मुंबई युनिव्हर्सिटी, कर्नाटक राज्य महिला विद्यापीठ, विनोबा भावे युनिव्हर्सिटी हजारीबाग, कालिकत विद्यापीठ आणि जैवतंत्रज्ञान, बायोमेडिकल व 
बायोइनफॉरमेटिक डिपार्टमेंट, वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ तंत्रज्ञान सोलापूर येथील विद्यार्थ्यांना यात सहभाग घेतला. आरोग्य क्षेत्रात संशोधन आधारित उपाय आणि कृत्रिम जीवशास्त्र, फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग, बिग डेटा विश्लेषण, बायोसेन्सर, आयओटी, बायोमेडिकल इमेजिंग, रोबोटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या विविध विषयांवर उपस्थित तज्ञांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी कमी खर्चात 
वैद्यकीय उपकरणे विकसित करणे आणि बायोइंजिनिअरिंग विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे यासाठी उभारण्यात आलेल्या 'बायोमेडिकल इंजिनियरिंग प्रयोगशाळेचे' उद्घाटन करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com