माळेगाव आश्रमशाळेतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जानेवारी 2018

टाकवे बु. : सुख दु:खाच्या चार गुजगोष्टी बालपणीच्या सवंगडयांनी शाळेच्या व्हरांड्यात मनमोकळेपणाने मांडल्या, कोणाचे लग्न झाले आहे, कोणी पैलवानकी करीत आखाडयाच्या मैदानात शड्डू थोपटत आहे, कोणी शासकीय सेवेत आहे, तर कोणी कारखानदारीत, कोणाच्या हातात औताचा नांगर आहे. प्रत्येक जण आपापले सांगत होता, आणि ऐकत होत्या शाळेच्या निर्जीव भिंती व या विद्यार्थ्यांना घडविणारे गुरूजन. 

निमित्त होते या सर्वांनी शाळेसाठी वाचनालयाची पुस्तके, शिवप्रतिमेसह वेगवेगळ्या प्रतिमा भेट देण्याचा उपक्रम. या शैक्षणिक संकुलात चार धडे गिरवून बाहेर पडलेल्या आदिवासींच्या लेकरांच्या पंखात बळ आले आहे, जगण्याचा निखळ आनंद मिळवत असताना दु:खाच्या लकेर त्यांना थोपवू पाहत आहेत, या सर्वावर मात करायला मनातील गुजगोष्टी करायला वर्गातील मित्र मैत्रिणी खेरीज दुसरी हक्काची जागा नाही. माजी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाला विश्वस्त डॉ. कृष्णकांत वाढोकर, योगतज्ज्ञ वसंत पवार यांनी  शुभेच्छा दिल्या. यावेळी वसंत बारवे, कृष्णा भांगरे, प्रमिला भालके, शिवाजी भोर, सुषमा येंदे, अश्विनी पाटिल, कांबळे सदाशिव, सुनिल जारकड, सुनिल शिंदे, गणेश फराटे, दशरथ वडेकर विकास भालेघरे होते. मनोहर भालके यांनी प्रास्ताविक केले. सुषमा काठे यांनी सुत्रसंचालन केले. उज्ज्वला भोर यांनी आभार मानले. 

अनंता मेठल, लहू मोरमारे, भाऊ मोरमारे, अशोक धिंदळे, दत्ता हाडके, संजय चौधरी, रोहिदास गवारी, एकनाथ गवारी, सुरेश गवारी, वैशाली व नाजूका लाडके, गोरख सुपे, दत्ता कोकाटे, आशा काठे, भरत मेठल, बाबू मेठल, तुकाराम माळी, सुषमा काठे, वसंत माळी, यांच्यासह माळेगाव आश्रमशाळेतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा गप्पांच्या मैफिलीत रंगला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi news pune news pass out students getogether