पिंपरीत पिस्तुलासह एकास अटक 

संदिप घिसे
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

पिंपरी : पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या एकास पिंपरी पोलिसांनी अटक केली. ही घटना रविवारी रात्री पिंपरीत घडली. अतुल सुरेश डावरे (वय 28, रा. आदर्शनगर, काळेवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पिंपरी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक विठ्ठल बढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक व्यक्‍ती पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवरून वैभवनगर परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा लावून अतुलला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तूल आणि दोन काडतुसे मिळून आली.

अतुल काळेवाडी येथे फॅब्रिकेशनचा व्यवसाय करतो. तो अल्पवयीन असताना त्याच्यावर हाणामारीचा एक गुन्हा दाखल आहे. मात्र, त्याने हे पिस्तूल कोठून आणि कशासाठी आणले याबाबत पोलिस चौकशी करीत आहेत. वरिष्ठ निरीक्षक श्रीधर जाधव, मसाजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विठ्ठल बढे, बाळासाहेब अंतरकर, पोलिस हवालदार नागनाथ लकडे, शाकिर जिनेडी, महादेव जावळे, नीलेश भागवत, रोहित पिंजरकर, नितीन सूर्यवंशी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Web Title: Marathi news pune news pimpri arrest with pistol