सावित्री नदीच्या पुलावर प्राण वाचविणारा मदतीसाठी वणवण फिरतोय! 

अश्‍विनी जाधव केदारी
सोमवार, 29 जानेवारी 2018

पुणे : महाडच्या सावित्री नदीच्या पुलावर झालेल्या दुर्घटनेमध्ये अनेकांचे प्राण वाचविणारे बसंत कुमार सध्या आजाराने त्रस्त आहेत. तब्बल दीड वर्षांपासून बसंत कुमार सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. मणक्‍याच्या आजाराने त्रस्त असलेल्या बसंत कुमार यांच्याकडे उपचारांसाठी पैसे नाहीत. त्या काळरात्री अनेकांचे प्राण वाचविणारा हा 'देवदूत' सध्या मदतीसाठी वणवण फिरत आहे. 

महाडच्या सावित्री नदीच्या पुलावर ती काळरात्र आठवली, की आजही अंगावर शहारे येतात. त्या रात्री मुसळधार पावसामुळे सावित्री नदीच्या पुलावरील एक भाग तुटला आणि तेथून जाणाऱ्या दोन एसटी आणि आठ खासगी वाहने एकामागोमाग एक पाण्यात कोसळली. त्या वेळी अक्षरश: देवदूत बनून बसंत कुमार यांनी अनेकांचे प्राण वाचविले. त्यांच्या या कामगिरीचे मोठे कौतुकही झाले. त्यानंतर तब्बल वर्षभर ठिकठिकाणी बसंत कुमार यांचे सत्कार समारंभ झाले. त्यांच्याकडे प्रशस्तीपत्रकांचा ढीग आहे; पण मणक्‍याच्या दुखण्यावर उपचार करण्यासाठी पैसे मात्र नाहीत. या आजारपणातून बरे होण्यासाठी त्यांना आर्थिक मदतीची अपेक्षा आहे. 

काही दिवसांपूर्वी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन आणि पुण्यातील 'स्माईल फाऊंडेशन'ने त्यांच्या उपचारांची जबाबदारी घेतली. मुंबईतील नामांकित रुग्णालयात त्यांच्या आजाराचे निदान झाले. पुढे पुण्यातील साई स्नेह हॉस्पिटलमध्ये त्याने काही दिवस उपचार घेतले. अशातच आजारपणामुळे महाडमध्ये असलेली नोकरीही सुटली. 'आता काय काम करावे आणि काय खावे' अशी भ्रांत त्यांच्यासमोर आहे. जे काही थोडे पैसे होते, तेदेखील उपचारांसाठी खर्च झाले. सध्या तरी त्यांच्याकडे प्रशस्तीपत्रकांशिवाय काहीही नाही. 

मदतीसाठी :

  • बँक : भारतीय स्टेट बँक
  • नाव : Basant 
  • खाते क्रमांक : 36027866597 
  • IFSC : SBIN0011233
Web Title: marathi news pune news savitri river accident Mahad Basant Kumar