पुण्यात स्थायी समितीतून अध्यक्ष मोहोळच 'बाहेर'

अश्विनी जाधव केदारी
बुधवार, 31 जानेवारी 2018

स्थायी समितीच्या 16 सदस्यांपैकी अर्धे म्हणजेच आठ सदस्यांचा कार्यकाळ दरवर्षी संपुष्टात येतो. चिठ्ठीद्वारे ही नावे काढली जातात. ज्या पक्षांच्या सदस्यांची नावे येतात तेथे त्याच पक्षातील अन्य सदस्यांची निवड केली जाते. सध्या पक्षीय बलाबल प्रमाणे स्थायी समितीमध्ये भाजपचे 10, राष्ट्रवादी काँग्रेसचे चार, काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येकी एक सदस्य यांचा समावेश आहे.

पुणे : महापालिका निवडणुकीनंतर स्थायी समितीचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने समितीमधील आठ सदस्य आज (बुधवार) चिठ्ठीद्वारे बाहेर पडले. त्यात भाजपचे सर्वाधिक 4 सदस्य बाहेर पडले असून त्यात स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांचाही समावेश आहे.

समिती सदस्य पदाचा कार्यकाळ 2 वर्षांचा असल्याने निवडणुकीनंतर समितीचा पहिले वर्ष पूर्ण होताच 8 सदस्य बाहेर पडतात. आज काढण्यात आलेल्या चिठ्यांमध्ये भाजपचे 4 राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 सदस्य शिवसेना आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक या चिठ्यांमध्ये बाहेर पडला. सभागृहात उपस्थित अधिकारी तसेच नगरसेवकांच्या हस्ते काढण्यात आल्या.

स्थायी समितीच्या 16 सदस्यांपैकी अर्धे म्हणजेच आठ सदस्यांचा कार्यकाळ दरवर्षी संपुष्टात येतो. चिठ्ठीद्वारे ही नावे काढली जातात. ज्या पक्षांच्या सदस्यांची नावे येतात तेथे त्याच पक्षातील अन्य सदस्यांची निवड केली जाते. सध्या पक्षीय बलाबल प्रमाणे स्थायी समितीमध्ये भाजपचे 10, राष्ट्रवादी काँग्रेसचे चार, काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येकी एक सदस्य यांचा समावेश आहे. फेब्रुवारीतील मुख्यसभेत ही आठ नावे समितीला मुख्यसभेकडे सादर करावी लागणार आहेत.

समितीतून बाहेर पडलेले सदस्य : नाना भानगिरे, हरिदास चारवड, योगेश समेळ, मुरलीधर मोहोळ, रेखा टिंगरे, अनिल टिंगरे, प्रिया गदादे, अविनाश बागवे

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या :
भाजप म्हणते, राहुल गांधींचे जॅकेट 70 हजारांचे
आई-बाबा सांगा ना, आमची काय चूक...​
मृत तरुणी परत आल्याच्या अफवेने गोंधळ​
"हे राम' म्हटल्याबद्दलच्या विधानाचा विपर्यास​
सरकारी कर्मचाऱ्यांना रविवारी रजा नको; न्यायालयाची सूचना​
विकासवृद्धीसाठी झेपावे निर्यातीकडे!​

श्रीमंत देशांत भारत सहावा; अमेरिका प्रथम
तनिष्कने केली 1045 धावांची नाबाद विश्‍वविक्रमी खेळी​
दोषींवर कडक कारवाई करू; आदित्यनाथ यांनी मौन सोडले​

Web Title: Marathi news Pune news standing committee BJP municipal corporation