पीएमपीला शिस्त लावली, कामचुकारांना बाजूला केले: मुंढे

अश्विनी जाधव केदारी
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

बदली कधी होईल हे अधिकाऱ्यांच्या हातात नसते. पीएमपीमध्ये आयटीएमएसची उत्तम अंमलबजावणी करता आली. आता मोठी जबाबदारी मिळाली असून, मी आनंदी आहे. आव्हानात्मक जबाबदारी, काम करायला वाव आहे. पीएमपीचा अध्यक्ष असताना प्रवासी विरोधी असल्याचा आरोप झाला, पण एकही निर्णय प्रवासी विरोधी घेतला नाही.

पुणे : माझ्या कार्यकाळात पीएमपीएमएलमध्ये अमुलाग्र बदल करण्यात आले. जास्तीत जास्त बसेस रस्त्यावर आणण्याचा कायम प्रयत्न राहिला. संस्था बळकट करण्यासाठी विविध निर्णय घेतले. संस्थेला शिस्त लावली, कामचुकरांना बाजूला केले. चांगलं काम करण्याऱ्यांचे कौतुकही केले, असे पीएमपीएमएलचे माजी अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पीएमपीचा घसरलेला गाडा पुन्हा सुधारणांच्या 'ट्रॅक'वर आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारा अधिकारी, अशी पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांची प्रतिमा अल्पावधीत निर्माण झालेली असतानाच, राज्य सरकारने अवघ्या 11 महिन्यांतच त्यांची अनाकलनीयरीत्या बुधवारी बदली केली. नाशिक महापालिकेचे आयुक्त म्हणून मुंढे यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी वर्धा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांची नियुक्ती झाली आहे.

या बदलीनंतर बोलताना मुंढे म्हणाले, की बदली कधी होईल हे अधिकाऱ्यांच्या हातात नसते. पीएमपीमध्ये आयटीएमएसची उत्तम अंमलबजावणी करता आली. आता मोठी जबाबदारी मिळाली असून, मी आनंदी आहे. आव्हानात्मक जबाबदारी, काम करायला वाव आहे. पीएमपीचा अध्यक्ष असताना प्रवासी विरोधी असल्याचा आरोप झाला, पण एकही निर्णय प्रवासी विरोधी घेतला नाही. तोटा कमी करण्यात मोठे यश मिळाले. ठेकेदारांच्या गाड्यांना शिस्त आणली. आता 3 वर्षे सलग नाशिकला काम करायला आवडेल.

Web Title: Marathi news Pune news Tukaram Mundhe PMPML