स्त्रियांनी जिजाऊ, सावित्रीबाई, अहिल्यादेवींच्या विचारांचे आचरण करावे

संतोष आटोळे
गुरुवार, 8 मार्च 2018

शिर्सुफळ (पुणे) : आज समाजात स्त्रियां सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. यामध्ये ग्रामीण भागातील महिलांनीही पुढे येणे आवश्यक असुन यासाठी स्त्रियांनी चुल आणि मुल यापुरते मर्यादित न राहता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचे आचरण करावे असे आवाहन बारामती येथील विद्या प्रतिष्ठाऩ अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्या उज्वला सोनी यांनी केले.

कटफळ (ता.बारामती) येथील अजितदादा इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये 8 मार्च या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन माता पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उज्वला सोनी बोलत होत्या. याप्रसंगी विद्या प्रतिष्ठानच्या सुपे येथील इंग्लिश मिडीयमचे प्राचार्य योगेश पाटील, संस्थेच्या सचिव संगीता नानासो मोकाशी, संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह मोकाशी, स्कूलच्या प्राचार्या स्वाती आटोळे यांच्यासह मोठ्या संख्येने माता पालक उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना सोनी पुढे म्हणाल्या, मातांनी आपल्या रागावरती नियंत्रण ठेवून मुलांना प्रेमाने जिंकावे, मातृत्व ही स्त्रीला मिळालेली देणगी आहे. मुलांना शाळा शिकवत असताना त्यांच्यामध्ये चांगला नागरिक तयार करण्याचे काम स्त्रिच करु शकते यासाठी तिने सकारात्मक असणे आवश्यक आहे. तर योगेश पाटील यांनी स्त्रियांनी नेहमीच स्वकतृत्वावर स्वतःचे अस्तित्व निर्माण केले. सगळ्या जगामध्ये उत्तम मॅनेजमेंट गुरु ही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष स्त्रीच असल्याचे सांगितले. यावेळी शाळेतील विद्यार्थीनी आकिर्ती साह हिला तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळाल्याबद्दल तसेच शाळेलाही चित्रकला स्पर्धेत पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. हा मेळावा यशस्वीतेसाठी गीता भंडलकर, मोहिनी रेनूकर, प्रीती माळी, योगिता टकले, मनोज मदने, रणजित झगडे, ज्योती सुतार यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वाती आटोळे तर आभार वृषाली शेळके यांनी मानले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi news pune news womens day follow the respected personality