महिलांनी स्वत:साठी काही वेळ द्यावा - लिना खांडेकर

Sangavi
Sangavi

जुनी सांगवी (पुणे) : आजच्या धकाधकीच्या युगात घर, संसार, परिवार, नोकरी इत्यादी सर्व जबाबदार्या सांभाळत घरातील महिला स्वतःच्या चेहर्यावरील हास्य विसरत चालल्या आहेत. आजच्या जीवनशैलीत मानसिक ताणतणाव वाढत चालला आहे. या सगळ्या गोष्टींना सामोरे जाण्यासाठी महिलांनी दिवसातला काही वेळ स्वत:साठी द्यायला हवा. असे जुनी सांगवी जागतिक महिलादिनानिमित्त  तनिष्का गटाच्या वतीने आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात सौंदर्यतज्ञ लिना खांडेकर यांनी बोलताना व्यक्त केले.

त्या पुढे म्हणाल्या, स्त्रिया अनेक जबाबदाऱ्या सांभाळताना स्वत:च्या छंदाकडे, जगण्याकडे दुर्लक्ष करतात. अनेक महिला स्वतःला व्यक्त करत नाहीत. सकाळच्या तनिष्का स्त्री प्रतिष्ठा व्यासपीठाच्या माध्यमातुन महिलांना ही संधी उपलब्ध झाली आहे. तिचा उपयोग करून घ्यावा. यावेळी त्यांनी महिलांना सौंदर्य, मनाची प्रसन्नता व मेकअपवरील सल्ला देत प्रात्यक्षिकेही करून दाखवली.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिवसृष्टी उद्यानात या महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास सांगवी परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी विविध कार्यक्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्या महिलांचा त्यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तर विविध व्यवसाय कोर्सेस परिक्षा प्रशिक्षणात राबविण्यात आलेल्या उत्तीर्ण प्रशिक्षाणार्थींना यावेळी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

उपस्थित महिलांनी मनोगत व्यक्त केली. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सावित्रीबाई फुले पुरस्कार विजेत्या राजश्री पोटे यांचा गटाच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या आयोजिका शितलताई शितोळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सकाळ तनिष्का समुहाच्या भाग्यश्री थोरात यांनी महिलांना आजची सामाजिक परिस्थिती व महिला या विषयावर मार्गदर्शन केले.कार्यक्रमास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष श्री प्रशांत शितोळे यांनी उपस्थित राहुन महिलादिनानिमित्त महिलांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बबनराव शितोळे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राधिका घोडके यांनी केले तर आभार शितलताई शितोळे यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com