थंडीमुळे कोकणात मातीलाही लाली

वैशाली भुते
गुरुवार, 1 मार्च 2018

पिंपरी - कोकण परिसरातील मातीला थंड हवामानामुळे लाल रंग प्राप्त झाला असून, हिरवा रंग प्राप्त होण्यास उष्ण हवामान जबाबदार असल्याचे एका संशोधनातून आढळून आले. पिंपरी-चिंचवडमधील वनस्पतिशास्त्राचे अभ्यासक डॉ. संजय एकसंबेकर आणि पूना कॉलेजचे जिऑलॉजी विभागप्रमुख डॉ. मोहम्मदरफी सैयद यांनी केलेल्या आपल्या दोन वर्षांच्या दीर्घ संशोधनातून मातीच्या लाल व हिरव्या रंगामागील रहस्याचा उलगडा झाला आहे. 

कोकणातील मातीसंदर्भात आतापर्यंत अनेक संशोधने झाली असली, तरी वनस्पतिशास्त्राच्या (वनस्पतींमध्ये अतिशय सूक्ष्म स्वरूपात आढळून येणारी सिलिका अर्थात फायटोलिथ) माध्यमातून केले गेलेले हे पहिले संशोधन आहे. त्यांनी हा शोधनिबंध नुकताच आफ्रिकेतील केपटाउनमध्ये झालेल्या ‘जागतिक भूगोल परिषदे’मध्ये सादर केला. 

‘स्टडी ऑफ फायटोलिथ अँड मायक्रो मॉर्फोलॉजी स्टडी ऑफ लेट क्रेटेशिअस सॅंपल ऑफ रेड बोन अँड ग्रीन बोन’ असे या संशोधनाचे नाव आहे. मातीला लाल अथवा हिरवा रंग प्राप्त होण्यासाठी ५०-६० हजार वर्षांपूर्वी कोणती भौगोलिक परिस्थिती कारणीभूत होती, यावर हे संशोधन करण्यात आले. त्याअंतर्गत कोकण पट्ट्यातील विविध भागांतील लाल मातीचे ११, तर हिरव्या मातीचे १८ नमुने संकलित करण्यात आले होते. त्यावर डॉ. सैयद आणि डॉ. एकसंबेकर यांन एकत्र येऊन ‘वातावरणातील बदल’ (क्‍लायमेट इंडेक्‍स), ‘फायटोलिथ इंडेक्‍स’, त्या वेळेची वातावरणातील उष्णता व शीतलता या तीन ते चार घटकांवर अभ्यास केला. बहुतांश वेळा मातीमध्ये ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडणारी राख मिसळलेली असते. या राखमिश्रित मातीवर म्हणजेच ‘व्हॉल्कॅनिक ग्लास’वर डॉ. सैयद यांनी अभ्यास केला. तथापि, वातावरणातील शीतलता आणि उष्णतेचाच मातीच्या रंगावर परिणाम होत असल्याचे त्यातून सिद्ध झाले. 

फायटोलिथ म्हणजे
‘फायटो’ आणि ‘लिथ’ हे मूळचे ग्रीक शब्द. १८३५ मध्ये चार्ल्स डार्विन यांनी हॅटन बर्ग यांच्या मदतीने या शब्दांचा शोध लावला. ‘फायटो’ म्हणजे वनस्पती आणि ‘लिथ’ म्हणजे खडे. थोडक्‍यात, वनस्पतींच्या पेशींमध्ये अतिशय सूक्ष्म स्वरूपात हे ‘फायटोलिथ’ सापडतात.

Web Title: marathi news winter konkan pimpri