career networking platform: परदेशात नोकरी व शिक्षणासाठी गेलेल्या मराठी तरुणांना एकमेकांना सहाय्य करणाऱ्या 'मराठी रेफरल्स' या व्यासपीठाचा मोठा आधार ठरतो आहे. जर्मनीत स्थायिक असलेल्या अनिश बिवलकर व अल्पिता मसुरकर यांनी हे व्यासपीठ मराठी तरुणांसाठी तयार केले आहे.
परदेशात शिक्षण आणि रोजगारासाठी जाणाऱ्या तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परकी भूमीवर शिक्षण घेतल्यानंतर रोजगाराची संधी मिळणेदेखील तितकेच महत्त्वाचे ठरते. अशा स्थितीत ‘मराठी रेफरल्स’सारखे व्यासपीठ पुढे येते.