Marathi Sahitya Sammelan
Sakal
पुणे
Marathi Sahitya Sammelan : साताऱ्यातील संमेलनाला एक कोटी अतिरिक्त निधी, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा; बोधचिन्हाचे अनावरण
Uday Samant : साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य सरकारकडून १ कोटींचा अतिरिक्त निधी जाहीर करण्यात आला असून स्वायत्ततेवर भर देत लोकसहभागाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
पुणे : सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सरकारतर्फे एक कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी देण्याची घोषणा राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी बुधवारी केली. मात्र ‘जिथे लक्ष्मीचा खणखणाट असतो, तिथे सरस्वतीच्या वीणेचा झंकार क्षीण होण्याची शक्यता असते. त्यामुळे संमेलनासाठी लोकसहभागातून निधी गोळा करण्याचा प्रयत्न करू’, असे सांगत प्रा. मिलिंद जोशी यांनी साहित्य महामंडळाचा स्वायत्ततेचा आग्रह अधोरेखित केला.

