आंबेगाव तालुक्यातील लोणी उपबाजार समितीत कांद्याला उच्चांकी बाजारभाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

आंबेगाव तालुक्यातील लोणी उपबाजार समितीत कांद्याला उच्चांकी बाजारभाव

पारगाव : लोणी ता.आंबेगाव येथील मंचर बाजार समितीच्या उपबाजार समिती मध्ये आज बुधवारी कांद्याला प्रति 10 किलो किलोला 201 रुपये असा या हंगामातील उच्चांकी बाजारभाव मिळाला.उपबाजार लोणी येथे आज एकूण ८६७ कांदा पिशव्यांची आवक झाली. मे. शिवशंभो ट्रेडिंग कंपनी व झुंबरशेठ लहानु वाळुंज यांच्या आडत गाळयावर गंगाराम रामचंद्र वाळुंज व बबुशा कुंडलिक निकम या शेतक-यांच्या कांद्याला प्रति 10 किलोला 201 रुपये असा उच्चांकी बाजारभाव मिळाला खरेदीदार मच्छिंद्र वाळुंज व महेंद्र वाळुंज यांनी लिलावात बोली लावुन माल खरेदी केला. या हंगामातील कांदयाला उच्चांकी बाजार मिळाल्याने शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शेतक-यांनी लोणी उपबाजार समितीमध्ये आपल्या कांदयाची निवड व प्रतवारी करुन विक्रीस आणावा आपल्या मालाला योग्य बाजारभाव दिला जाईल असे बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांनी सांगितले कांदा लिलावामध्ये मच्छिंद्र वाळुंज, महेंद्र वाळुंज, ज्ञानेश्वर वाळुंज नितीन नरवडे,मनोहर ढोबळे, संजय भोजने आदींनी कांदा लिलावात सहभाग घेतला.कांदा लिलाव आठवड्यातील सोमवार बुधवार व शनिवार या दिवशी होणार असल्याची माहिती लोणी उपबाजार समितीचे कार्यालय प्रमुख अशोक राजापुरे यांनी दिली.