बापरे, उभ्या कोथंबीरीच्या पिकात फिरवला नांगर 

रवींद्र पाटे
Friday, 11 September 2020

बाजारभावात मोठी घट झाल्याने कोथंबीरीच्या उभ्या पिकात नांगर फिरवण्याची वेळ उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे.

नारायणगाव :  बाजारभावात मोठी घट झाल्याने कोथंबीरीच्या उभ्या पिकात नांगर फिरवण्याची वेळ उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे. कोरोनाचे संकट असताना कष्टाने पिकवलेली कोथंबीर मतीमोल झाल्याने जुन्नर,आंबेगाव तालुक्यातील उत्पादक शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजारात २७ ऑगस्ट २०२० रोजी झालेल्या लिलावात कोथंबीरीच्या जुडीला ५० रुपये ते ८० रुपयांच्या दरम्यान (शेकडा ५  हजार रुपये ते ८ हजार रुपये)भाव मिळाला होता. त्या नंतर सलग आठ दिवस कोथंबीरीच्या जुडीला ३० रुपये ते ५० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत होता. कोथंबीरीला एकरी सुमारे तीस हजार रुपये भांडवली खर्च येतो. पावसळी हंगामात एकरी सात हजार ते आठ हजार जुड्या उत्पादन निघते. आठ दिवसांपूर्वी उचांकी भाव मिळल्याने काही शेतकऱ्यांना एकरी दोन ते तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. मात्र मागील चार दिवसा पासून पाऊस सुरू आहे. कोथंबीरीच्या शेतात पाणी साठल्याने मुंबई बाजारपेठेत कोथंबीर विक्रीसाठी पाठवल्यास सडण्याचे प्रमाण वाढले. तसेच आवक वाढल्याने कोथंबीर बाजारभावत मोठी घट झाली.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

येथील उपबजारात शुक्रवारी रात्री दीड लाख जुड्याची आवक झाली. जुडीला पन्नास पैसे ते तीन रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला.या बाजार भावात काढणी मजुरी, वाहतूक खर्च वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांनी कोथंबीरीच्या उभ्या पिकात रोटव्हेटर फिरवीला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या बाबत खोडद येथील सचिन थोरात म्हणाले, सुमारे चाळीस हजार रुपये खर्च करून सव्वा एकर क्षेत्रात कोथंबीरीचे पीक घेतले होते.मंगळवारी विक्रीसाठी नेलेल्या दोन हजार जुड्याना शेकडा तीनशे रुपये भाव मिळाला. मजुरी व वाहतूक खर्च वसूल न झाल्याने आज एक एकर कोथंबीरीच्या शेतात रोटव्हेटर फिरवला. 

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The market price of cilantro declined