दौंडमध्ये भुसार मालाचे बाजारभाव तेजीत

दौंडमध्ये भुसार मालाचे बाजारभाव तेजीत

दौंड , ता. ५ : दौंड तालुक्यात मक्याची आवक घटली असून बाजारभावात प्रतिक्विंटल १०० रुपयांची वाढ झाली आहे. मक्याची ४२ क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रतवारीनुसार किमान १९५० तर कमाल २३०० रुपये प्रतिक्विंटल, असा बाजारभाव मिळाला आहे. दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड मुख्य बाजारात भुसार मालाची आवक वाढली झाली असून बाजारभाव तेजीत आहेत.

केडगाव उपबाजारात भुसार मालाची आवक व बाजारभाव स्थिर आहे. दौंड येथे भाजीपाल्याची आवक स्थिर असून बाजारभावही तेजीत आहेत. केडगाव येथे तुरीची ३४ क्विंटल आवक झाली असून प्रतवारीनुसार किमान ९९०० तर कमाल ११००० रुपये प्रतिक्विंटल, असा बाजारभाव मिळाला आहे. चवळीची १६ क्विंटल आवक होऊन त्यास किमान १५००० व कमाल १७०५० रुपये असा बाजारभाव मिळाला होता.

कोथिंबिरीची ८१४० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ८०० तर कमाल ३००० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला. मेथीची ५०० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान १३०० व कमाल २४०० रुपये असा बाजारभाव मिळाला. केडगाव उपबाजारात लिंबाची २६ डाग आवक झाली असून प्रतवारीनुसार कमाल १७०० रुपये प्रतिडाग, असा बाजारभाव मिळाला आहे.

शेतमालाची आवक व बाजारभाव :
*शेतमाल आवक (क्विंटल) किमान (रु.) कमाल (रु.)
गहू ५४४ २१०० ३२००
ज्वारी २६४ २००० ४०००
बाजरी १४६ १८०० ३०००
हरभरा ११९ ५४०० ६६००
मका ०४२ १९५० २३००
मूग ०६४ ६५०० ७७५०


भाजीपाल्यास मिळालेला बाजारभाव पुढीलप्रमाणे (प्रतिदहा किलोसाठीचे कमाल बाजारभाव) : बटाटा-२७०, आले-१०००, गाजर-२५०, काकडी-२५०, भोपळा-१००, कोबी- १५०, फ्लॅावर-३००, टोमॅटो-३००, हिरवी मिरची-८००, भेंडी-५७०, दोडका-५७०, वांगी - ३७०, शेवगा - ६५०, गवार - ६००, बिट-३००, भुईमूग शेंग-४४०.


दोडका व भेंडीचे बाजारभाव वधारले
दोडक्याची २४ क्विंटल आवक झाली असून प्रतिदहा किलोसाठी किमान १०० तर कमाल ५७० रुपये असा बाजारभाव मिळाला. तालुक्यात भेंडीची २५ क्विंटल आवक झाली असून प्रतिदहा किलोसाठी किमान १०० तर कमाल ५७० रुपये असा दर मिळाला.


कांद्याच्या बाजारभावात वाढ
केडगाव उपबाजारात कांद्याची ५४६३ क्विंटल आवक झाली प्रतवारीनुसार किमान ७०० तर कमाल २७०० प्रतिक्विंटल असा असा बाजारभाव मिळाला आहे. मागील आठवड्यात कांद्याची ८८६५ क्विंटल आवक होऊन त्यास किमान ६०० व कमाल २५०० रुपये असा बाजारभाव मिळाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com