

मार्केट यार्ड, ता. १ : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात फळभाज्यांची आवक वाढली आहे. रविवारी (ता. १) बाजारात ९० ते १०० ट्रकमधून शेतमाल विक्रीसाठी दाखल झाला. आवकेच्या तुलनेत मागणी कमी झाल्याने टोमॅटो, मिरची, कोबी, फ्लॉवर आणि वांगी यांच्या भावात १० टक्क्यांनी घसरण झाली असून, उर्वरित सर्व फळभाज्यांचे भाव गत आठवड्याच्या तुलनेत टिकून आहेत.
परराज्यांतून झालेल्या आवकेत बंगळुरू येथून आले दोन टेम्पो, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातून हिरवी मिरची २० ते २२ टेम्पो, कर्नाटकातून कोबी व घेवडा प्रत्येकी चार ते पाच टेम्पो आणि पावटा दोन ते तीन टेम्पो, इंदूरमधून गाजर तीन ते चार टेम्पो, हिमाचल प्रदेशातून मटार ६०० गोणी, तामिळनाडूतून शेवगा तीन ते चार टेम्पो व तोतापुरी कैरी ७० ते ८० क्रेट, गुजरात आणि कर्नाटकातून भुईमूग तीन ते चार टेम्पो, मध्य प्रदेशातून लसूण १० ते १२ टेम्पो, तर इंदूर, आग्रा आणि स्थानिक भागातून बटाट्याची ५० टेम्पो आवक झाली होती.
स्थानिक भागातून झालेल्या आवकेत सातारी आले सुमारे ४०० ते ४५० गोणी, भेंडी सहा ते सात टेम्पो, गवार पाच ते सहा टेम्पो, टोमॅटो आठ ते १० हजार क्रेट, हिरवी मिरची पाच ते सहा टेम्पो, काकडी सहा ते सात टेम्पो, फ्लॉवर १४ ते १५ टेम्पो, कोबी सात ते आठ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, गाजर पाच ते सहा टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, घेवडा तीन ते चार टेम्पो, पावटा दोन टेम्पो, नव्या आणि जुन्या कांद्याची सुमारे १०० ते १२५ टेम्पो इतकी आवक झाली होती.
फळभाज्यांचे १० किलोचे भाव :
कांदा : ३७०-४३०, बटाटा : १००-२००, लसूण : ८००-२५००, आले (सातारी) : ८००-१७००, भेंडी : २००-३५०, गवार : ४००-६००, टोमॅटो : ८०-१००, दोडका : ३००-४५०, हिरवी मिरची : २५०-३५०, दुधी भोपळा : १००-२००, चवळी : २००-२५०, काकडी : २००-३००, कारली : हिरवी : २००-२५०, पांढरी : १८०-२००, पापडी : ४००-४५०, पडवळ : १५०-२००, फ्लॉवर : ५०-१००, कोबी : ५०-६०, वांगी : १५०-३००, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : ५०-६०, ढोबळी मिरची : ३५०-४००, तोंडली : कळी : ३५०-४००, जाड : १८०-२००, शेवगा : ६००-८००, गाजर : २२०-३२०, वालवर : ३५०-४००, बीट : २४०-२५०, घेवडा : ४००-५००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २५०-३००, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : २५०-३००, भुईमूग शेंग : ७००-८००, मटार : १०००-१३००, पावटा : ८००-१०००, तांबडा भोपळा : ८०-१५०, तोतापुरी कैरी : ७००-८००, सुरण : १८०-२२०, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.
पालेभाज्या तेजीत
रविवारी मार्केट यार्डातील बाजारात कोथिंबिरीच्या एक लाख, तर मेथीच्या ७० हजार जुड्यांची आवक झाली.
पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : १५००-२०००, मेथी : १०००-१५००, शेपू : १२००-१५००, कांदापात : १०००-१२००, चाकवत : १२००-१५००, करडई : ८००-१०००, पुदिना : ५००-६००, अंबाडी : ८००-१०००, मुळे : १०००-१५००, राजगिरा : ६००-८००, चुका : ६००-८००, चवळई : ६००-८००, पालक : ८००-१२००.
संत्री, मोसंबी, ड्रॅगन, लिंबाच्या भावात घट
मार्केट यार्डातील फळबाजारात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फळांना मागणी घटली असून भावातही घसरण झाली आहे. सद्यःस्थितीत दिवाळीच्या सणासाठीच्या खरेदीची लगबग सुरू असल्याने ग्राहकांकडून फळांची खरेदी कमी होत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. संत्री, मोसंबी, ड्रॅगन फ्रुट, लिंबू, कलिंगड, खरबुजाच्या भावात घसरण झाल्याचेही व्यापाऱ्यांनी सांगितले.
फळबाजारात रविवारी लिंबू १२०० ते १४०० गोणी, मोसंबी ७० ते ८० टन, संत्री ४० ते ५० टन, डाळिंब ५० ते ६० टन, पपई १० ते १५ टेम्पो, कलिंगड ८ ते १० गाड्या, खरबूज १८ ते २० टेम्पो, चिक्कू दोन हजार डाग, पेरू साडेतीन ते चार हजार क्रेट, पिअर पाच गाड्या, सीताफळ आठ ते १० टन, ड्रॅगन फ्रूट १२ ते १५ टन, सफरचंद सहा ते सात हजार पेटी आणि अननसाची सहा ट्रक इतकी आवक झाली होती.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : ३०० ते १६००, मोसंबी : (तीन डझन) : १२०-३२० (चार डझन) : ४०-१३०, संत्री : (१० किलो) : २००-७००, डाळिंब (प्रतिकिलो) : भगवा : ६०-२५०, आरक्ता : १०-६०, गणेश : १०-४०, कलिंगड : ८-१५, खरबूज : १२-३०, पपई : १२-२५, चिक्कू (१० किलो) : १००-६००, पेरू (२० किलो) : ३००-५००, अननस (एक डझन) : ३००-९००, सीताफळ (एक किलो) : २०-१००, पिअर (२४ ते २५ किलो) : ३५००-४०००. ड्रॅगन फ्रूट (एक किलो) : ७०-१००, सफरचंद काश्मीर डेलिशियस (१५ ते १७ किलो) : १४००-२२००, किन्नोर (२० ते २५ किलो) : ४०००-४५००, शिमला (२० ते २५ किलो) : ३०००-३५००.
फुलांच्या आवकेसह मागणीत घट :
कोजागरीनंतर फुलांच्या आवकेसह मागणीत घट झाली आहे. आवक-जावक कायम असल्याने गत आठवड्यातील भाव टिकून आहेत.
फुलांचे भाव पुढीलप्रमाणे : झेंडू : १०-४०, गुलछडी : ३०-६०, अॅस्टर : गड्डी १०-१५, सुट्टा : ६०-१००, शेवंती : ४०-८०, गुलाबगड्डी (गड्डीचे भाव) : १०-२०, गुलछडी काडी : ५०-१००, डच गुलाब (२० नग) : ८०-१५०, जर्बेरा : ३०-५०, कार्नेशियन : १५०-२००, शेवंती काडी : २००-४००, लिलियम (१० काड्या) : १०००-१२००, ऑर्किड : ४००-६००, ग्लॅडिओ (१० काड्या) : ८०-१२०, जिप्सोफिला : १५०-२५०, लीली बंडल : ६-१०, जुई : ४००-५००, चमेली : ४००-५००.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.