

Jowar-Bajra Price Hike
Sakal
मार्केट यार्ड : थंडीची चाहूल लागल्याने मागील काही दिवसांपासून बाजारात मोठ्या प्रमाणात बाजरीला मागणी वाढली आहे. बाजरी ही उष्ण असल्याने थंडीत आवर्जून खाल्ली जाते, तसेच ज्वारीलाही मागणी वाढली आहे. यंदा पडलेल्या सततच्या पावसामुळे बाजरी आणि ज्वारीच्या उत्पादनात घट होणार आहे. त्यामुळे बाजरी, ज्वारीचे दर क्विंटलमागे २०० ते ५०० रुपयांनी वाढले आहेत. यंदा दर तेजीत राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.