
मार्केट यार्ड : बाजार समितीच्या कांदा-बटाटा-लसूण विभागात विभागवार खरेदी-विक्री करावी, असा नियम असूनही त्याची अंमलबजावणी होत नाही. अनेक अडते बेकायदा अन्य विभागांत कांदा-बटाटा-लसूण यासह फळांचा व्यापार करतात. अशा व्यवहारामुळे शेतकऱ्यांचे दररोज कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. या प्रकाराला संचालक मंडळ जबाबदार असून, परिस्थिती अधिक गंभीर झाली असल्याचा आरोप फेडरेशन फॉर अॅग्रो, कॉमर्स अँड ट्रेड केला आहे.