
Pune Market Yard
Sakal
मार्केट यार्ड : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील गैरव्यवहारांबाबत पणनमंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेत उच्चस्तरीय चौकशीची घोषणा केली होती. मात्र त्या घोषणेला दोन महिने उलटून गेले तरी कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे ही घोषणा फक्त जुमला ठरल्याची टीका सुरू झाली आहे. आज पुणे दौऱ्यावर येणाऱ्या रावल यांनी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.