Mango : खवय्यांची पावले गावरान आंब्याकडे

बाजारात कोकणातील हापूसची आवक तुरळक होत आहे, तर दुसरीकडे मागील १५ दिवसांपासून गावरान आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे.
village mango
village mangosakal
Updated on

मार्केट यार्ड - बाजारात कोकणातील हापूसची आवक तुरळक होत आहे, तर दुसरीकडे मागील १५ दिवसांपासून गावरान आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे खवय्यांची पावले गावरान आंब्याकडे वळली आहेत. गावरान आंब्याला चांगली मागणी आहे.

हापूस आंब्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. बाजारात हापूसची आवक २०० ते ३०० पेटीपर्यंत आहे. त्यातच कर्नाटक हापूसची चांगली आवक होत आहे. मात्र, रत्नागिरीनंतर नागरिक गावरान आंब्याची आवर्जून वाट पाहत असतात. गावरान आंबा खाऊनच ग्राहक हंगामाचा शेवट करत असतात. मार्केट यार्डातील फळबाजारात शुक्रवारी (ता. २४) ९० टन आंब्याची आवक झाली.

जुलैपर्यंत गावरान आंब्याचा हा हंगाम सुरू राहणार आहे. मावळ, मुळशी, भोर तालुक्यासह खेड, मंचर भागासह जिल्ह्यातून आणि नगर जिल्ह्यातून ही आवक होत आहे. गावरान हापूसबरोबरच पायरी, केशरची आवक बाजारात होत आहे. त्यामुळे या आंब्याला मागणी आहे.

पूर्व मोसमी पावसामुळे मागील आठवड्यात आंबा खरेदीकडे नागरिकांनी पाठ फिरविली होती. मात्र, आता पुन्हा आंब्याला मागणी वाढली आहे. आवक वाढल्यामुळे गावरानची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. घरगुती ग्राहकांसह किरकोळ विक्रेत्यांकडून मागणी आहे. येत्या काळात आवक आणखी वाढण्याचा अंदाज व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

आंब्याचा प्रकार आणि कच्च्या आंब्याचे किलोचे भाव

४० ते ८० रुपये - गावरान हापूस

२० ते ५० रुपये - पायरी

३० ते ८० रुपये - केशर

बाजारात सेंद्रिय आंबा

दररोज ७० कॅरेट विक्रीसाठी येथील बाजारात सेंद्रिय आंबा दाखल होत आहे. नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथून सेंद्रिय खत वापरून तयार केलेला आंबा बाजारात येत आहे. १० एकर शेतीमध्ये डॉ. अप्पासाहेब गबाजी नरोडे यांनी हा प्रयोग केला आहे.

त्यांनी १४ वर्षांपूर्वी १० एकर शेतीमध्ये आंब्याची बाग लावली आहे. यासाठी कोणत्याही केमिकलयुक्त बुरशी अथवा कीटकनाशकाचा वापर केलेला नाही. आंबा हा सेंद्रिय खत वापरून तयार झाला असल्याचे टीयूव्ही लॅबचे प्रमाणपत्र आहे.

मार्केट यार्डात आता गावरान आंब्याची आवक वाढली आहे. त्यास नागरिकांकडून चांगली मागणी आहे. शुक्रवारी (ता. २४) केशरला किलोला सर्वाधिक ८५ रुपये भाव मिळाला.

- युवराज काची, आंब्याचे व्यापारी, मार्केट यार्ड.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.