Marriage : मुलाचे घर पाहण्यासाठी आले आणि लग्न लावून गेले...

लग्न म्हटले की, मिरवणूक, डीजे, हॉल, हळद, फोटोग्राफी, रिसेपशन, यासह विविध कार्यक्रम ठेवून हजारो रुपयांचा खर्च केला जातो.
Marriage
MarriageSakal
Summary

लग्न म्हटले की, मिरवणूक, डीजे, हॉल, हळद, फोटोग्राफी, रिसेपशन, यासह विविध कार्यक्रम ठेवून हजारो रुपयांचा खर्च केला जातो.

निरगुडसर - लग्न म्हटले की, मिरवणूक, डीजे, हॉल, हळद, फोटोग्राफी, रिसेपशन, यासह विविध कार्यक्रम ठेवून हजारो रुपयांचा खर्च केला जातो. मात्र राऊत व डगले कुटुंबियांनी एकाच दिवशी सर्व विधी पूर्ण करून लग्न समारंभ कार्यक्रम संपन्न केल्याने दोन्ही कुटुंबाचा पैसा तर वाचलाच पण यातून एक समाजात आदर्श निर्माण केला आहे. मुलाचे घर पाहण्यासाठी आले आणि लग्न लावून गेले हा लग्न सोहळा निरगुडसर ता.आंबेगाव येथे पार पडला.

लग्न म्हटले की, थाटात होणारा गंधाचा कार्यक्रम, घरात धावपळ, पै पाहुणे, लग्न पत्रिका वाटप, बस्ता या सर्व गोष्टींचे नियोजन करावे लागते लग्न तिथीच्या १५ ते २० दिवस अगोदरच भावकितीतील लोकांना सर्व जबाबदारी वाटुन दिली जाते. मात्र निरगुडसर येथे मुलाचे घर पाहण्यासाठी आलेले मुलिकडच्या कुटूंबीय, पाहुणे मंडळींनी मुलीचे लग्न लावूनच घरी गेले. १३ डिसेंबर रोजी पार पडलेल्या या विवाहात अनावश्यक खर्च टाळत सर्व लग्न विधी एकाच दिवशी पार पाडल्याने उपस्थित वऱ्हाडी, ग्रामस्थांनी दोन्ही कुटुंबीयांचे कौतुक केले.

निरगुडसर, ता. आंबेगाव येथील कै. सुरेश राऊत यांचा मुलगा मंगेश राऊत व संगमनेर येथील साईखिंडी गावचे रवींद्र तानाजी डगले यांची कन्या सुजाता यांचा विवाह निरगुडसर येथे १३ रोजी संपन्न झाला. दोन दिवसापूर्वी निघोज या ठिकाणी एका दशक्रिया कार्यक्रमात डगले कुटुंबीय व राऊत कुटुंबीय यांची विवाह संदर्भात थोडक्यात बोलाचाली झाली होती. त्यानंतर ता. १२ रोजी मुलाकडचे लोक मुलीचे घर पाहून आले. नंतर मुलीकडचे कुटुंबीय ता. १३ रोजी निरगुडसर येथे मुलगा व त्याचे घर पाहण्यासाठी आले होते. मुलींच्या कुटुंबीयांना घर मुलगा इतर बाबी आवडल्याने गंध व लग्नाची बोलाचारी सुरू झाली. लग्ना बाबत बोलणी असतानाच मुलाकडच्या लोकांनी मंगेश हा एकुलता एक मुलगा असून त्याच्या वडिलांचे निधन झाल्याने घरात फक्त आई व मुलगा आहे.

जबाबदार व्यक्ती म्हणुन मुलाचे चुलते गणपत राऊत, चुलत भाऊ महेश राऊत, उज्वला जाधव, श्रीराम प्रतिष्ठानचे कार्यकर्ते यांनी आपली दोन्ही कुटुंबे सर्वसामान्य आहेत वारंवार खर्च करणे आपल्याला परवडणार नाही. त्यामुळे आजचा मुहूर्त चांगला असून आजच लग्नाच्या सर्व विधी पूर्ण करून लग्न लावून घेऊ सर्व नियोजन आम्ही करतो असे मत मांडले. त्यावेळी मुलीकडच्यांनीही त्याला होकार दिला. त्यानंतर मुलाकडच्या, मुलीकडच्या लोकांनी लगेचच भावकी, नातेवाईक, मित्र परिवार यांना फोनद्वारे संपर्क करून साखरपुडा, लग्नाची वेळ सांगितली. निवडक कपडे घेऊन मुलाचा, मुलीचा बस्ता एकाच ठिकाणी घेतला गेला. तोपर्यंत मुलीकडचे वऱ्हाड ही मुलाच्या घरी आले. निरगुडसर येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात साखरपुडा करुन वधू वराच्या हळदीचा कार्यक्रम झाला. त्यानंतर जेवण व सायंकाळी ५ : ३० दरम्यान दोन्ही कुटूबियांच्या पाहुणे मंडळीच्या उपस्थितीत विवाह पार पडला. या विवाह कार्यक्रमासाठी निरगुडेश्वर शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष प्रतापराव वळसे पाटील, गावचे उपसरपंच आनंदराव वळसे पाटील, माजी उपसरपंच शांताराम गावडे, उद्योजिका मनीषा वळसे पाटील, यासह गावातील विविध मान्यवर उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com