
पुणे : लग्नात हुंडा दिला नाही व नवीन फ्लॅट घेण्यासाठी पाच लाख रुपये माहेरहून आणण्यासाठी सासरच्यांकडून केल्या जाणाऱ्या छळास कंटाळून विवाहीतेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी दुपारी साडे चार वाजता हडपसरमधील सय्यदनगर येथे घडला.
हसीना तन्वीर शेख (वय 23, रा. सय्यदनगर, हडपसर) असे आत्महत्या करणाऱ्या विवाहीतेचे नाव आहे. याप्रकरणी हसीना शेख यांची आई अकिला सय्यद (वय 45, रा.मुंबई) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन पती तन्वीर अनवर शेख यांच्यासह चारजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी हसीना हिचे तन्वीर शेख याच्याशी मागील वर्षी एप्रिल महिन्यात लग्न झाले होते. लग्न झाल्यापासून पती व सासरच्या लोकांकडून हसीना हिला माहेरच्यांनी लग्नामध्ये हुंडा दिला नाही, संसारपयोगी वस्तु दिल्या नसल्याच्या कारणावरुन तिचा शारिरीक व मानसिक छळ केला जात होता. तसेच काही दिवसांपासून सासरच्यांकडून हसीना हिने नवीन फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणावेत, यासाठी तिला त्रास दिला जात होता. या छळाला कंटाळून हसीना यांनी शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या कारणावरुन पतीसह चौघांविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
2022 मध्ये शरद पवार होणार राष्ट्रपती?; संजय राऊतांचे नवे मिशन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.