
पुणे : राखी पौर्णिमेला भावाला बोलाविल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याने उच्चशिक्षित विवाहित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी रात्री अकराच्या सुमारास कात्रज परिसरातील आंबेगाव बुद्रूक भागात ही घटना घडली. माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा शारिरिक आणि मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून भारती विद्यापीठ पोलिसांनी पतीसह सासरकडील नातेवाइकांवर गुन्हा दाखल केला आहे.