मराठा आरक्षणासाठी संभाजी ब्रिगेडने पेटवली 'मशाल'!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 September 2020

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी मराठा समाजातील मुलांनी एसईबीसी अंतर्गत अर्ज केले आहेत. त्याबाबत राज्य सरकारने स्पष्टीकरण द्यावे, अशा मागण्या या वेळी करण्यात आल्या.

पुणे : मराठा समाजातील मुलांच्या शिक्षण आणि नोकरीमधील आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे समाजात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. याबाबत सरकारला जाग यावी, यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने केंद्रीय निरीक्षक विकास पासलकर यांच्या नेतृत्त्वाखाली लाल महालसमोर मंगळवारी (ता.१५) सायंकाळी मशाल आंदोलन करण्यात आले. 

या आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे प्रशांत धुमाळ, विराज तावरे, चंद्रकांत घाडगे, अविनाश मोहिते, मंदार बहिरट, प्राची दुधाने यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

भारताच्या 'शुक्रयान'कडे वळल्या जगाच्या नजरा; शुक्रावर जाणारी जगातील एकमेव मोहीम!​

मराठा समाजाचा इतर मागास (ओबीसी) प्रवर्गात समावेश करावा, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काढलेला अध्यादेश तात्काळ रद्द करावा, मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या नव्याने होणाऱ्या सर्व प्रवेश प्रक्रियेत शुल्कात 50 टक्‍के सवलत द्यावी, त्याची जबाबदारी सरकारने घ्यावी. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत पोलिस भरतीसह कुठलीही मेगा भरती प्रक्रिया घेऊ नये, 'सारथी' ला तात्काळ वाढीव आर्थिक मदत द्यावी, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी मराठा समाजातील मुलांनी एसईबीसी अंतर्गत अर्ज केले आहेत. त्याबाबत राज्य सरकारने स्पष्टीकरण द्यावे, अशा मागण्या या वेळी करण्यात आल्या.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mashal agitation of Sambhaji Brigade for Maratha reservation at Pune