

माशाळवस्तीत स्वच्छतेचा बोजवारा
प्रभाग २३ मधील नागरिक त्रस्त; नियमित साफसफाईची मागणी
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १३ : प्रभाग क्रमांक २३ मधील माशाळवस्ती परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून स्वच्छतेच्या समस्या गंभीर बनल्या असून, वारंवार तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार देवराय जमादार यांनी केली आहे.
माशाळवस्ती रिंगरोड परिसर, पापाराम नगर, आलमखान नगर तसेच आगीराजेंद्र नगर भागात मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे ढीग साचत आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून महिला, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि कामगार वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यालगत टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
नियमित साफसफाई होत नसल्याने पाच ते सात दिवस कचरा उचलला जात नाही. परिणामी डासांचे प्रमाण वाढून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच घंटागाडी वेळेवर येत नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन नियमित साफसफाई आणि कचरा उचलण्याची प्रभावी व्यवस्था करावी, अशी मागणी श्री. जमादार यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.