esakal | Coronavirus : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या इंदापूर शाखेच्या वतीने मास्क वाटप
sakal

बोलून बातमी शोधा

इंदापूर - इंदापूर आयएमए च्या वतीने पत्रकार शहराध्यक्ष सुरेश जकाते याना मास्क वाटप करताना सचिव डॉ. अनिल पुंडे शिर्के. सोबत डॉ. संजय शहा, डॉ. महेश रूपनवर.

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या इंदापूर शाखेच्या वतीने महामार्ग पोलीस, पोलीस ठाणे तसेच पत्रकारांना कोरोना विषाणू संसर्ग होवू नये म्हणून मास्क वाटप करण्यात आले. सर्वसामान्य नागरिक यांचा कोरोना संक्रमणापासून बचाव व्हावा यासाठी इंदापूर शहर, पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग व परिसरातील महत्वाच्या ठिकाणी इंदापूर शाखेच्या वतीने जनजागृती फलक लावण्यात आले आहेत.

Coronavirus : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या इंदापूर शाखेच्या वतीने मास्क वाटप

sakal_logo
By
डॉ. संदेश शहा

इंदापूर - इंडियन मेडिकल असोसिएशनच्या इंदापूर शाखेच्या वतीने महामार्ग पोलीस, पोलीस ठाणे तसेच पत्रकारांना कोरोना विषाणू संसर्ग होवू नये म्हणून मास्क वाटप करण्यात आले. सर्वसामान्य नागरिक यांचा कोरोना संक्रमणापासून बचाव व्हावा यासाठी इंदापूर शहर, पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग व परिसरातील महत्वाच्या ठिकाणी इंदापूर शाखेच्या वतीने जनजागृती फलक लावण्यात आले आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इंडियन मेडिकल असोसिएशन इंदापूर शाखेचे अध्यक्ष डॉ. नामदेव गार्डे, सचिव डॉ. अनिल पुंडे - शिर्के, उपाध्यक्ष डॉ. महेश रुपनवर, आपत्ती व्यवस्थापन संचालक डॉ. मंगेश पाटील, माजी अध्यक्ष डॉ. संजय शहा यांच्या हस्ते हे उपक्रम पार पडले.

यानिमित्त अध्यक्ष डॉ. नामदेव गार्डे म्हणाले, असोसिएशन, स्वर्गीय पै. पांडुरंग रामचंद्र खिलारे गुरुजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन खिलारे, यश इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्सची विद्यार्थ्यांनी अंजली जाधव हे गेली 15 दिवसापासून अंबुलन्स रुग्णसेवेबरोबरच शहर व परिसरातील चौकाचौकात कोरोना संदर्भात जनजागृती करत आहेत. सचिव डॉ. अनिल पुंडे - शिर्के म्हणाले, कोरोना विषाणूमुळे जागतिक महामारी निर्माण झाली आहे.

मात्र योग्य दक्षता घेतल्यास हा आजार संपूर्णपणे बरा होवू शकतो. त्यामुळे नागरिकांनी सरकार तसेच आरोग्य प्रतिनिधींच्या तुलनांचे पालन करावे.

loading image