
राज्यात सोमवारी 6 हजार 397 नवीन कोरोना रुग्ण सापडले तर 30 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दिवसभरात 5 हजार 754 जण कोरोनामुक्त झाले.
पुणे - देशातील अनेक राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत आहे. महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. य़ाच पार्श्वभूमीवर राज्यात काही ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. जगातील काही देशात अद्याप लॉकडाऊन आहे. मास्क हीच आपली कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील ढाल असल्याचं ते म्हणाले.
पुण्यात विनामास्क फिरणाऱ्यांना 500 ते 2 हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जात आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पुणे पोलिसांनी ट्विटरवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचा हा व्हिडीओ असून त्यात मास्क न घालता मैदानावर तो बसलेला दिसतो. तेव्हा एक महिला कर्मचारी रोनाल्डोला मास्क घालण्यास सांगते. रोनाल्डोसुद्धा त्या महिलेनं सांगितल्यानंतर लगेच मास्क लावतो असा तो व्हिडीओ आहे.
पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
रोनाल्डोचा व्हिडीओ शेअर करताना पुणे पोलिसांनी म्हटलं की, मास्क बंधनकारक आहे, तुम्ही रोनाल्डो असला तरी यातून सूट नाही.
राज्यात सोमवारी 6 हजार 397 नवीन कोरोना रुग्ण सापडले तर 30 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दिवसभरात 5 हजार 754 जण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत राज्यातील 20 लाख 30 हजार 458 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात रिकव्हरी रेट 93.94 टक्के इतका असून सध्या 77 हजार 168 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
हे वाचा - पुणेकरांच्या आरोग्यासाठी हजार कोटींची तरतूद
कोरोनाचा धोका अद्याप कमी झालेला नसल्यानं पुणे प्रशासनाने शहरातील शाळा, कॉलेजेस आणि क्लासेस 14 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय शहरात रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदीही लागू करण्यात आली आहे.