

After Landslide Evacuation, Thieves Target 20 Homes in Lonavala Village
sakal
लोणावळा : दरड कोसळल्यानंतर नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने पाटण गाव रिकामे करण्याचे आदेश दिले. गावात सामसूम पाहून चोरट्यांनी एका रात्रीत तब्बल २० घरांतून लाखोंचे दागिने, रोकड आणि मौल्यवान वस्तू लंपास केल्या. या चोरीमुळे ग्रामस्थांमध्ये संताप, असुरक्षितता आणि प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त होत आहे.