
-कल्याण पाचांगणे
माळेगाव : माळेगाव (ता. बारामती) सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (ता.२२) सहा गटात ८८ .४८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ९० उमेदवारांचे भवितव्य मत पेटीमध्ये बंद झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार उमेदवार असलेले 'ब' वर्ग सभासद संस्था मतदारसंघात १०२ मतदार आहेत. त्यातील १०१ जणांनी मतदानाचा हक्का बजावला. या प्राप्त स्थितीचा विचार करता माळेगावचे चेअरमन होणे अजित पवार की चंद्रराव तावरे यांच्या नशीबात आहे, हे मंगळवार (ता. २४) रोजी मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.