

Major Fire Incident at Pats Factory; Questions Over Late Fire Brigade Arrival
esakal
कानगाव: दौंड तालुक्यातील पाटस येथील एम.आर.एन. भीमा सहकारी साखर कारखान्यात सोमवारी (दि. ३०) सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास बगॅसला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत बगॅस भरण्यासाठी उभा असलेला एक ट्रक पूर्णतः जळून खाक झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.