Traffic Congestion : दर्गा ते विमाननगर बीआरटी हटवासाठी सह्यांची मोहीम

Traffic Congestion : पाच हजार नागरिकांनी सह्या करून दिला पाठिंबा.
signature campaign
signature campaignsakal
Updated on

वाघोली - पुणे-नगर महामार्गावरील दर्गा ते विमाननगर पर्यंत असणारी बीआरटी हटवावी अशी मागणी नागरिक करीत आहे. या हटाव मागणीसाठी आज सहयांची मोहीम राबविण्यात आली. सुमारे पाच हजार नागरिकांनी सह्या करून बीआरटी हटाव मोहिमेला पाठिंबा दिला.

वाहतूक नियंत्रण समितीने बीआरटी हटाव मोहिमेसाठी पुढाकार घेतला आहे. या बी आर टी मुळे वाहतूक कोंडी तर होतेच. शिवाय अनेक अपघात घडतात. अर्धवट बीआरटी ठेवून प्रवाशांनाही फायदा होत नाही. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास होत आहे. असे समितीचे म्हणणे आहे. बी आर टी हटवावी. अशी नागरिकांचीही मागणी आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com